महत्वाच्या बातम्या
-
अजित पवार आणि अनिल परबांविरुद्ध CBI चौकशी करण्याची मागणी | कोर्टात याचिका दाखल
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची नावे आपल्या जबाबात घेतली असून या दोघांवर गुन्हा दाखल करून, CBI कडे चौकशी करण्याची मागणी अॅड. रत्नाकर डावरे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी नोंदवलेल्या जबाबामुळे संजय राठोड यांना मोठा दिलासा | जबाबात काय?
राज्य सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागलेलं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या मिटण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे पूजाच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवलेला जबाब. कारण, आमची कोणा विरोधात काही तक्रार नसल्याचा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. तर, यामुळे शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra SSC Result 2021 | दहावीचा निकाल ९९.९५ टक्के | असा पहा ऑनलाईन
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. (How to Check Maharashtra SSC Result 2021)
4 वर्षांपूर्वी -
पुन्हा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ | शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर मध्ये एका टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान या प्रकरणी भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
साडेसाती सुरु? | ED नव्हे, केंद्राच्या अखत्यारीतील EPFO खात्याकडून पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त करून ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली. भाजप नेत्या पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहेत. कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत होती.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, रस्ते आणि रेल्वे वाहतूक प्रभावित
शहरात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहर विभागापेक्षा उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra ITI Admission 2021 | आजपासून प्रवेशप्रक्रिया सुरु | कसा कराल अर्ज
ITI ADMISSION प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील 417 शासकीय आणि 549 खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (ITI) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यंदा शासकीय आयटीआयमध्ये 92 हजार तर खासगी आयटीआयमध्ये 44 हजार अशा एकूण 1 लाख 36 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज (15 जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण यापैकी तीन मुख्य विषयांवर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धा तास बैठक झाली. शरद पवार उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ
सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी बरेच शेतकरी उत्सुक दिसत आहेत. लोड शेडींगमुळे गरजेच्या वेळी पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची हि अडचण लक्षात घेवून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकर्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ दिला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेची 10 लाखाची मदत | स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार - एकनाथ शिंदे
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांवर सर्वच बाजूनी संकट कोसळलं होतं. त्यानंतर आज शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
4 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | राज्यातील इयत्ता दहावीचा उद्या निकाल लागणार | असा ऑनलाईन चेक करा
राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होता. आता ताज्या माहितीनुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महावितरण मध्ये 98 पदांची भरती | मराठवाड्यातील तरुणांना संधी | ई-मेलने अर्ज
महाडिसकॉम रिक्रूटमेंट २०२१. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन अधिसूचना प्रकाशित केली असून इलेक्ट्रीशियन, वायरमन व सीओपीए पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार महावितरण भरती 2021 साठी 13 ते 19 जुलै 2021 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज दाखल करु शकतात.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली | राज्यपालांकडे विविध मागण्याचे निवेदन दिले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत सायकल रॅली काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप आणि आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल चालवत राज्यपालांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस नेते सायकलवरून राजभवनात गेले होते. यावेळी काँग्रेसतर्फे राज्यपालांना इंधन दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही | त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही | फडणवीसांच्या या विधानाचा अर्थ काय?
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांच्यात आणि फडणवीसांदरम्यान सर्वकाही ठीक नसल्याचं अप्रत्यक्षरीत्या सूचित केलं होतं. त्यातून भाजपामध्ये त्यांच्या विरोधात अंतर्गत धुसफूस असल्याचं देखील अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट झालं आहे. तसेच मला नाराजी व्यक्त करायची असेल तर ही जागा देखील कमी पडेल असे म्हटल्याने त्यांच्या भविष्यातील बंड करण्याच्या शक्यता देखील निर्माण झाल्या होत्या. मात्र आता फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर त्यात भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याचे मुख्यमंत्री अव्वलस्थानी आल्याने भाजपने दुःख वाटून घेऊ नये | तुमचे लाडके योगी आदित्यनाथ आहेत ५ नंबरला
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. “भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर प्रदेशचं कौतुक करत असतात, पण या सर्वेक्षणात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाचवा नंबर आहे, हे भारतीय जनता पक्षाने विसरु नये” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
पवारांच्या राष्ट्रपती पदाबाबतच्या वृत्तावर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण | काय म्हटलं?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती होण्याच्या शर्यतीत असल्याची कालपासून राज्यभर, देशभर चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | परमबीर सिंह यांच्याविरोधात मुक्त चौकशीचे ACB'ला राज्य सरकारकडून आदेश
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) मुक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच सिंह यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे अनेक गंभीर आरोप कले होते.
4 वर्षांपूर्वी -
OBC आरक्षण | छगन भुजबळ आणि फडणवीस यांच्यादरम्यान चर्चा | केंद्राकडील इम्पेरिकल डाटा...
ओबीसी आरक्षणावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कारण याच विषयावरून पुन्हा राजकीय गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. मात्र या गाठीभेटी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आहेत हे विशेष म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा केली.
4 वर्षांपूर्वी -
भोसरी भूखंड प्रकरण | न्या. झोटिंग समिती अहवालात खडसेंविरोधात ठपका? - सविस्तर वृत्त
भोसरी (पुणे) एमआयडीसीतील भूखंड खरेदीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला ‘ईडी’ने अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंसंदर्भातील न्या. झोटिंग समितीच्या अहवालात खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका समोर आला आहे. खडसेंवर भूखंड खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने ३० जून २०१७ रोजी गोपनीय अहवाल शासनाकडे सादर केला होता. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर खडसे यांना ४ जून २०१६ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
4 वर्षांपूर्वी -
सकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार
राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून(15 जुलै) सुरू होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत 5 जुलैला शासन निर्णय जारी केला होता. कोरोनामुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 15 जुलैपासून सुरू होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER