राज्य सरकारने आता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी | फडणवीसांचा टोला

हिंगोली , २१ ऑक्टोबर: “राज्य सरकारने आता नुसता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी”, असा खोचक सल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. “राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. रोज प्रसारमाध्यमांमध्ये माईकसमोर येऊन नुसते बोलतात. मात्र, प्रत्यक्षात निर्णय कधी घेणार”, असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. हिंगोली जिल्ह्याचा दौरा सुरू करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
“शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तरी सरकारआता जागे व्हायला हवे. सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत कोणतेही गांभीर्य नाही. अशा परिस्थितीतही सरकारमधील नेते फक्त टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा करत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा हा आक्रोश समजून घेऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे”, अशीही मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
“मला असं वाटतं की सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलत आहेत, मीडियात येऊन बोलत आहेत. पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्यांचा आक्रोश समजून तात्काळ निर्णय घ्या,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“आम्हाला जयंत पाटलांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जयंत पाटलांनी आम्हाला खोटं ठरवण्याऐवजी मदत करा ना. लोक इतके अडचणीत आहेत, पण पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.
News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has strongly advised the state government to take action instead of just talking nonsense. There are only speaking leaders in the state government. Every day in the media, they just come in front of the mic and talk. However, Devendra Fadnavis also raised the question of when the decision will be taken. Before starting his tour of Hingoli district, Devendra Fadnavis interacted with the media. This time he was talking.
News English Title: State government should now take action instead of talking nonsense says Devendra Fadnavis News Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH