20 June 2021 2:34 PM
अँप डाउनलोड

VIDEO | दारूबंदी तो बहाणा है, 'मालपाणी निशाना है | रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला

Rupali Chakankar

पुणे, ३० मे | चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दारुबंदी हा तर केवळ एक बहाणा आहे. चंद्रपुरातील काही लोक अवैध दारुविक्रीच्या माध्यमातून मालपाणी मिळवतात. दारुबंदीचा निर्णय उठवल्यास ते मालपाणी बंद होईल, असा देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा आशय आहे. परंतु असं असताना देखील महाविकास आघाडी सरकारच्या चंद्रपुरातील दारुबंदी उठवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते सरकारच्या निर्णयावर तुटून पडले होते.

ठाकरे सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लोक दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. परंतु, दारुबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती.

याच विषयाला अनुसरून रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषणाचा एक जुना व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस दारुबंदी उठवण्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देताना ऐकायला मिळत आहे. त्याचाच संदर्भ देत रुपाली चाकणकर यांनी टोला लागवताना म्हटलंय की, “दारूबंदी तो बहाणा है… “मालपाणी” निशाना है…. नशा दौलत का ऐसा भी क्या… के तुझे कुछ भी याद नहीं… क्या हुआ तेरा…

 

News English Summary: Following the same topic, Rupali Chakankar has shared an old video of Devendra Fadnavis’ speech in the hall. In this, Devendra Fadnavis is being heard while convincing how the decision to lift the embargo is right.

News English Title: NCP leader Rupali Chakankar take a dig at Devendra Fadnavis over liquor ban decision news updates.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x