20 June 2021 3:46 PM
अँप डाउनलोड

उत्तर महाराष्ट्र भाजपमुक्तीकडे? | जळगाव भाजपच्या ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

BJP Maharashtra

मुंबई, ३० मे | जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाला गळती सुरुच असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या आणखी ३ नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जळगाव भारतीय जनता पक्षाच्या 3 नगरसेवकांचा मुंबईत पक्षप्रवेश केला. मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील दहा आजी माजी नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश ताजा असतानाच आठवड्याभरातच भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का मिळाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जळगाव महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता होती. यापूर्वी 27 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शनिवारी आणखी तिघांनी शिवसेनेचा झेंडा हाती धरला. भारतीय जनता पक्षाच्या निम्म्या नगरसेवकांचा गट शिवसेनेत गेल्याचं चित्र आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवकांचा सेनाप्रवेश झाला.

जळगाव भाजपमधून शिवसेनेत पक्षप्रवेश करणारे नगरसेवक:

  1. सुरेश सोनवणे
  2. शोभाताई बारी
  3. शेख हसीना बी शेख शरीफ

 

News English Summary: The Bharatiya Janata Party in Jalgaon Municipal Corporation seems to be leaking. Three more BJP corporators tied Shivbandhan. In the presence of Shiv Sena chief and Chief Minister Uddhav Thackeray, 3 Jalgaon Bharatiya Janata Party corporators joined the party in Mumbai.

News English Title: Jalgaon 3 BJP corporators join Shivsena in presence of CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(630)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x