4 May 2025 5:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

वाधवान कुटुंबियांवर गुन्हा दाखल; १४ दिवसांसाठी खासगी रुग्णालयात क्वारंटाइन

Amitabh Gupta, Wadhawan Family, DHFL Promoters, Corona Crisis, Covid19

पाचगणी, १० एप्रिल: लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरला जाणे डीएचएफएलचे संस्थापक कपिल वाधवान यांना महागात पडले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी कपिल वाधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील २३ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसंच, त्यांना पुढच्या १४ दिवसांसाठी पाचगणीतील एका खासगी रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.

वाधवान कुटुंबीय लॉकडाऊनचे उल्लंघन करत खंडाळ्यावरुन महाबळेश्वर येथे गेले. याप्रकरणी वाधवान कुटुंबातील २३ जणांविरोधात महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पाचगणीच्या एका खासगी रुग्णालयात या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणाऱ्या विशेष प्रधान सचिवांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

 

News English Summary: The Wadhwan family went to Mahabaleshwar on a pillar violating the lockdown. A case has been registered against 23 members of the Wadhwan family at Mahabaleshwar police station. Also, they have been quarantined at a private hospital in Panchgani for 14 days as per the order of the district administration. Importantly, action has been taken against the Special Principal Secretaries who have helped the Wadhwan family to visit Mahabaleshwar.

News English Title: Story case register against Wadhawan family 25 members in Mahabaleshwar police station Quarantine Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या