वंचितला मोठा धक्का! माजी आमदारांसह तब्बल ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम शिरसकर, वंचितचे महाराष्ट्र राज्य सचिव नवनाथ पडळकर, देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर यांच्यासह ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये या पदाधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा राहीला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राजीनामा देणाऱ्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांचा समावेश आहे. यासोबतच पक्षाचे सरचिटणीस नवनाथ पडळकर, अर्जून सलगर यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला शेवटचा ‘जय भिम’ केला आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ‘महाविकास आघाडी’सह भाजपला पर्याय निर्माण करण्याचे आंबेडकरांचे प्रयत्न आहेत. मात्र, राज्यातील तिसऱ्या राजकीय शक्तीचं स्वप्नं पाहणाऱ्या आंबेडकरांच्या प्रयत्नांना या सामूहिक बंडामूळे मोठी खिळ बसली आहे.
तत्पूर्वी, वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला होता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले असता हा असा आरोप केला होता. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपली भविष्यातील भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं होतं.
पुढे बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले होते की, “वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता, पण वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे. वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाज वंचित आघाडीबाबत निराश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी समाजाचे नेते होते का? हा प्रश्न आहे. त्यामुळे वंचित आघाडी समाजापर्यंत पोचली का हा देखील गंभीर प्रश्न आहे. वंचित सोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का हा देखील मोठा प्रश्न आहे.” असं ते म्हणाले होते.
News English Summery: The disadvantaged Bahujan Front has been hit hard. Former MLA Haridas Bhade, former MLA Baliram Shirskar, Maharashtra State Secretary of the deprived Navnath Padalkar, supervising committee chief Arjun Salgar have resigned. These office bearers have played an important role in the Lok Sabha and Assembly elections. This has created a big gap in the deprived Bahujan front.
Web Title: Story Prakash Ambedkars Vanchit Bahujan Aghadi 48 top leader resignation.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC