जिंकलो नाही पण संपलो ही नाही: उदयनराजे भोसले

साताराः विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा झाल्या. पायाला जखमा असतानाही वयाच्या ८०व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे आणि उदयनराजेंना पराभव पाहावा लागला.
राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा ८७,७१७ मतांनी पराभव केला, श्रीनिवास पाटील यांना ६३६६२० एवढी मतं मिळाली असून, भारतीय जनता पक्षाच्या उदयनराजेंना ५४८९०३ एवढं मताधिक्य मिळालं आहे. शरद पवारांनी या विजयावर सूचक प्रतिक्रिया दिली होती. मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला ही घोषणा यशस्वी ठरल्याचं सांगत पवारांनी सातारकरांचे आभार मानले. आता उदयनराजेंनीही पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही’, अशी भावनिक पोस्ट उदयनराजे भोसले यांनी लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केली आहे. तसेच ‘लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर’, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवरुन केली आहे. या केलेल्या पोस्टवरुन ते अधिकच भावनिक झाल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्हा चर्चेत राहिला. कारण भारतीय जनता पक्षाच्या मेगाभरतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे होणार्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे प्रचंड मतांनी जिंकून येणार असा दावा भारतीय जनता पक्षाने केला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाचा हा दावा साफ चुकीचा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले उदयनराजे भोसले यांना लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला आहे. कारण कॉलर उडवत स्टाईल दाखवणार्या उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्ह्यात अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी ८७ हजार ७१७ मतांनी पराभव केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER