अण्णा इले नाही 'अण्णा गेले' | रात्रीस खेळ चाले- 2 मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार
मुंबई, २९ ऑगस्ट: झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले २’. गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा सीझन चांगलाच गाजत होता. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तसेच झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. तसेच दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
या मालिकेत शेवंताच्या मृत्यूनंतर सुरु झालेला रात्रीचा खेळ, अण्णांनी ज्यांचे जीव घेतले त्या सर्वांची भूतं अण्णांना त्रास देऊ लागली होती. मात्र माईंनी अण्णांना यातून बाहेर काढले. मात्र म्हणतात या जन्माचे याच जन्मी भोगावे लागते. त्यामुळे अभिरामच्या साखरपुड्यात काहीतरी विघ्न येणार याची चाहूल माईंना लागली आहे. त्यामुळे आज नेमकं काय होणार याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका २९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवट पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे अण्णा जगाचा निरोप घेताना होणार आहे. पण कसा घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच ३१ ऑगस्ट पासून ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर सुरु होणार आहे. ही मालिका साडेदहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे भयभीत करणारे प्रोमोज सध्या झी मराठी वाहिनीनवर दाखवले जात आहे. सत्य घटनेवर आधारित या मालिकेची कथा आहे.
News English Summary: The most popular series on Zee Marathi channel is ‘Ratris Khel Chale 2’. The second season of the mysterious and thrilling series ‘Ratris Khel Chale’ was well received. But now the series is going to say goodbye to the audience soon. Also, a new series on Zee Marathi will be released soon.
News English Title: Popular serial on ZEE Marathi Ratris Khel Chale 2 will be end today this new serial will be start from 31st August 2020 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा