 
						63 Moons Share Price | 63 मुन्स या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने 30 जून 2023 रोजी आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. 63 मून कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 256.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर 12.80 टक्क्यांच्या वाढीसह 246.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
MCX ने डिसेंबर 2023 पर्यंत 63 मुन्स कंपनीसोबतचा करार वाढवला आहे. या डील अंतर्गत 63 मुन्स कंपनीला प्रत्येक तिमाहीत MCX कडून 125 कोटी रुपये शुल्क दिले जाणार आहे. या बातमीमुळे 63 मुन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे.
63 मुन्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के नफा कमावून दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहिती नुसार 63 मुन्स आणि MCX यांच्यात 11 तासांची सेवा देण्याचा करार झाला आहे. हा नवीन करार जुलै 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत लागू असेल.
63 मुन्स कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, 63 मुन्स ही MCX ची संस्थापक आणि माजी प्रवर्तक कंपनी होती. MCX ने यावेळी तिसऱ्यांदा 63 Moons सोबत सॉफ्टवेअर सपोर्ट सर्व्हिस अरेंजमेंट डील बाबत कराराला मुदत वाढ दिली आहे. यापूर्वी MCX ने ही सेवा जून 2023 पर्यंत वाढवली होती. आता हा करार डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
त्यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये MCX कंपनीने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या कराराला मुदत वाढ दिली होती. दरम्यान एमसीएक्सच्या शेअर्समध्ये किंचित पडझड पाहायला मिळाली. एमसीएक्स कंपनीचे शेअर 12 टक्क्यांच्या घसरणीसह 1437 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		