13 December 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Eiko Lifesciences Share Price | मल्टिबॅगर Eiko लाईफसायन्स शेअर्सच्या गुंतवणुकदारांना राइट्स इश्यूचा लाभ मिळणार, स्टॉक तपशील जाणून घ्या

Eiko Lifesciences Share price

Eiko Lifesciences Share Price | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही इक्को लाईफसायन्स शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी लवकरच राइट्स इश्यू जाहीर करणार आहे. 28 जून रोजी कंपनी इक्को लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स 3.61 टक्क्यांच्या घसरणीसह 61.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 101 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 35.25 रुपये होती. इक्को लाईफसायन्स कंपनीचे बाजार भांडवल 50.96 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी इक्को लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स 5.25 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इक्को लाईफसायन्स कंपनीचे संचालक मंडळ लवकरच राइट्स इश्यूच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील. कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी पार पडली आहे. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने राईट इश्यूच्या अटी आणि शर्ती यासह राईट इश्यू प्रमाण, इश्यूची किंमत, कॉलची संख्या आणि त्याच्याशी संबंधित इतर बाबींची चर्चा केली आहे.

इक्को लाईफसायन्स कंपनी विशेष आणि सूक्ष्म रसायन क्षेत्रात व्यवसाय करते. कंपनी गुंतवणूकीचे काम देखील करते. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51.15 कोटी रुपये आहे. आर्थिक आकडेवारीनुसार इक्को लाईफसायन्स कंपनीचे चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्षाचे निकाल सकारात्मक आहेत.

कंपनीने आपले कर्ज मोठ्या प्रमाणात फेडले आहेत. सध्या कंपनी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्या अतिरिक्त भांडवल उभारणीसाठी आपल्या गुंतवणूकदारांना शेअर इश्यू करून गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतात, यालाच राइट्स इश्यू म्हणतात.

इक्को लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 11 टक्क्यांनी कमजोर झाले होते. तर महिल 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात इक्को लाईफसायन्स कंपनीच्या शेअर्सची कामगिरी जवळपास सपाट राहिली होती.

मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 260 टक्के नफा कमावून दिला आहे. इक्को लाईफसायन्स कंपनीला सेबीकडून तत्वतः मान्यता प्राप्त झाली आहे. कंपनीला 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स जारी करून 25 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची परवानगी मिळाली आहे. रेकॉर्ड तारखेनुसार केवळ कंपनीच्या पात्र इक्विटी शेअर धारकांना राईट इश्यूचा लाभ मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Eiko Lifesciences Share price today on 01 July 2023.

हॅशटॅग्स

Eiko Lifesciences Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x