1 May 2025 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC
x

8th Pay Commission Salary | सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, आता नव्या वेतन आयोगामुळे पगाराची रक्कम अजून वाढणार, आकडा पहा

8th Pay Commission Salary

8th Pay Commission Salary | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही काम करत असाल तर सरकारकडून (मोदी सरकार) आठव्या वेतन आयोगाबाबत एक मोठं अपडेट समोर येत आहे. नुकतीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ झाली आहे. आता जुलै महिन्यात सरकार पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच नवीन वेतन आयोग स्थापन करू शकते आणि यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात 44 टक्क्यांहून अधिक वाढ होणार आहे.

पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आठवा वेतन आयोग आणण्याची मागणी करत आहेत. अशावेळी देशभरात पुन्हा एकदा आठव्या वेतन आयोगाची चर्चा जोर धरू लागली आहे. याचा फायदा देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांचा संसदेत उल्लेख
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आठव्या वेतन आयोगाबाबत संसदेत चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर आठव्या वेतन आयोगावर चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर मागील वेतन आयोगाच्या आधारे त्याची गणना केली जाणार आहे.

2024 मध्ये नवीन वेतन आयोग स्थापन होण्याची शक्यता
सरकार 2024 च्या अखेरीस नवीन वेतन आयोग स्थापन करू शकते आणि तो 2026 मध्ये लागू होऊ शकतो, असे मानले जात आहे. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होईल. सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत यात मोठे बदल होऊ शकतात. सुमारे १० वर्षांतून एकदा वेतन आयोग बदलला जातो.

पगारात किती वाढ होणार?
केंद्रीय कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, सध्या किमान वेतनमर्यादा १८ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये वेतनवाढीत फिटमेंट फॅक्टरला खूप महत्त्व देण्यात आले आहे. हा घटक २.५७ पट असला तरी सातव्या वेतन आयोगाने तो ३.६८ पट ठेवण्याची शिफारस केली आहे. हे सरकारने मान्य केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजाररुपयांवरून २६ हजार रुपयांपर्यंत वाढेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 8th Pay Commission Salary Hike check details on 19 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#8th Pay Commission Salary(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या