
Adani Power Share Price | गौतम अदानी यांच्या मालकीच्या 7 कंपन्याचे स्टॉक भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. यात अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी विल्मार, अदानी पॉवर यासारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत.
यामध्ये सर्वात स्वस्त शेअर अदानी पॉवर कंपनीचा आहे. या कंपनीच्या शेअरवर तज्ज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 2.71 टक्के घसरणीसह 278.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची टार्गेट प्राईस :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी अदानी पॉवर कंपनीच्या शेअरवर 300 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 274 रुपये स्टॉप लॉस देखील जाहीर केला आहे. शेअर बाजारातील काही तज्ञ या स्टॉकबाबत जबरदस्त उत्साही आहेत. त्यांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 316 रुपयेपर्यंत वाढू शकतो. अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये दैनंदिन चार्टवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. हे स्टॉक वाढीचे सकारात्मक संकेत मानले जातात.
तिमाही कामगिरी :
अदानी पॉवर कंपनीने 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत 83.3 टक्के वाढीसह 8,759.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 4,779.86 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कालावधीत कंपनीने 18,109.01 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी 2023 या तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 15,509 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीचा खर्च 9,642.80 कोटी रुपयांवरून कमी होऊन 9,309.39 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.