Anant Ambani | ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर अधिकृत प्रवेश मिळाला आहे. ऑईल टू टेलिकॉम व्यवसायात कार्यरत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरहोल्डर्सनी कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदी नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ईशा आणि आकाश (32) या जुळ्या मुलांना रिलायन्सच्या संचालक मंडळावर नियुक्त होण्यासाठी 98 टक्क्यांहून अधिक मते मिळाली, तर 28 वर्षीय अनंत अंबानी यांना 92.75 टक्के मते मिळाली.
मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. इंटरनॅशनल प्रॉक्सी अॅडव्हायजरी फर्म इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेस इंकने शेअरहोल्डर्सना अनंत अंबानी यांच्या नियुक्तीविरोधात मतदान करण्याचा सल्ला दिला होता. यापूर्वी सल्लागार कंपनी आयआयएएसनेही अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता.
IiAS’ने 9 ऑक्टोबर रोजी अहवाल दिला होता की अंबानी कुटुंबाची वयाच्या 28 व्या वर्षी नियुक्ती आमच्या मतदान मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाही. ईशा आणि आकाशच्या बोर्ड प्रवेशाच्या प्रस्तावांना सल्लागाराने पाठिंबा दिला होता.
कोणत्या मुलावर कोणती जवाबदारी
गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी आपला मोठा मुलगा आकाश अंबानी यांना देशातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा केला होता. मात्र, अंबानी जिओ प्लॅटफॉर्म्सचे चेअरमन राहिले. या अंतर्गत रिलायन्स जिओ इन्फोकॉम येते. आकाशची जुळी बहीण ईशा (वय ३१) हिची रिलायन्सच्या रिटेल शाखेसाठी तर धाकटा मुलगा अनंतची नव्या ऊर्जा व्यवसायासाठी निवड करण्यात आली.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.