
Bonus Shares | एचपीसीएल या सरकारी कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात 25 टक्क्यांची घट नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत एचपीसीएल कंपनीने 2,709.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 3,608.32 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( एचपीसीएल कंपनी अंश )
मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने कच्च्या तेलाचे प्रत्येक बॅरल इंधनामध्ये रूपांतरित करून 6.93 डॉलर्स कमावले होते. तर मागील तिमाहीत हा आकडा प्रति बॅरल 8.50 डॉलर्स होता. आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी एचपीसीएल स्टॉक 0.030 टक्के घसरणीसह 500.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एचपीसीएल कंपनीने 16,014.61 कोटी रुपये नफा कमावला होता. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीला 6,980.23 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आता एचपीसीएल कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येक दोन शेअर्सवर एक बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. जुलै 2017 नंतर एचपीसीएल कंपनीचा हा पहिला बोनस इश्यू असेल. कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 21 जून 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.
याशिवाय एचपीसीएल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गुंतवणुकदारांना प्रति इक्विटी शेअर 16.50 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 7 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीने प्रति शेअर 15 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्के घसरणीसह 501.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीचे शेअर्स 497 रुपये या नीचांक किमतीवर आले होते. ऑक्टोबर 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरने 239.25 रुपये ही 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.