13 December 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, रेकॉर्ड तारीख पूर्वी हा शेअर खरेदी केल्यास मिळतील फ्री बोनस शेअर्स

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 300 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के वाढीसह 282.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी अल्कार्गो लॉजिस्टिक कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले 3 बोनस शेअर्स बोनस वाटप करण्याची घोषणा केली होती. मात्र कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही.

यापूर्वी 2015 मध्ये ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अल्कार्गो लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 272.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षभरात ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्क्यांनी घसरली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 8 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares today on 13 November 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x