 
						Digikore Studios IPO | डिजीकोर स्टूडियो या चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही सिरीजमध्ये व्हिज्युअल इफेक्ट सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने नुकताच आपला IPO लाँच केला होता. या कंपनीच्या IPO ला 281 पट अधिक मागणी प्राप्त झाली आहे. डिजीकोर स्टूडियो या कंपनीच्या आयपीओ स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये देखील अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते डिजीकोर स्टूडियो IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 47 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे IPO शेअर्स 4 ऑक्टोबर 2023 रोजी स्टॉक एक्स्चेंजमध्ये केले जाणार आहेत.
डिजीकोर स्टूडियो कंपनीचा IPO 281 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 370.17 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. त्याच वेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 362.65 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन बायर्ससाठी जो कोटा राखीव ठेवण्यात आला होता, तो 65.63 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
डिजीकोर स्टूडियो IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट खरेदी करू शकत होते. कंपनीने आपल्या एका लॉटमध्ये 800 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 136,800 रुपये जमा करावे लागले होते. IPO लिस्टिंगनंतर डिजीकोर स्टूडियो कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे फक्त 66.55 टक्के भाग भांडवल शिल्लक राहणार आहे.
सध्या या कंपनीचे IPO शेअर्सचा ग्रे मार्केटमध्ये 80 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. डिजीकोर स्टूडियो कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 168-171 रुपये निश्चित केली आहे. जर हा IPO स्टॉक 171 रुपये अप्पर किमतीवर वाटप केला गेला, तर डिजीकोर स्टुडिओ कंपनीचे शेअर्स 251 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणुकदारांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 47 टक्के नफा सहज मिळू शकतो. डिजीकोर स्टुडिओ कंपनीच्या IPO चा आकार 30.48 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		