
ICICI Vs Axis Vs HDFC | आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यापासून जवळपास सर्वच बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. बँका कर्ज आणि एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत. यामुळे बँकांकडून कर्ज घेणे महागात पडले आहे. त्याचबरोबर एफडीवर जास्तीत जास्त व्याज देण्याची बँकांमध्ये स्पर्धा आहे. अशा तऱ्हेने जर तुम्ही कुठे तरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एफडीमध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
आता तुम्ही विचार करत असाल की कोणत्या बँकेत एफडी घेणं चांगलं ठरेल. आज आम्ही तुम्हाला अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या खासगी क्षेत्रातील तीन प्रमुख बँकांच्या एफडीवरील व्याजदरांबद्दल सांगत आहोत. अलीकडच्या काळात या बँकांनी एफडीवरील व्याज वाढवले आहे. जाणून घेऊया या बँकांच्या व्याजदरांविषयी.
एचडीएफसी बँक
खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेकडे तुमच्यासाठी १५ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी प्लॅन उपलब्ध आहेत. बँक १५ महिन्यांपासून १८ महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडीवर जास्तीत जास्त व्याज देत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे व्याज ७.१० टक्के आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के दराने दिले जात आहे. बँकेचे हे नवे एफडी दर २१ फेब्रुवारी २०२३ पासून लागू होणार आहेत.
आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँकेकडे तुमच्यासाठी 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी अनेक एफडी प्लॅन आहेत. बँक 18 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर जास्तीत जास्त व्याज देत आहे. सामान्य नागरिकांसाठी ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज दर आहे. बँकेचे हे नवे एफडी दर २४ फेब्रुवारी २०२३ पासून लागू होणार आहेत.
अॅक्सिस बँक
अॅक्सिस बँकेकडे १० वर्षांच्या कालावधीसाठी अनेक एफडी प्लॅन उपलब्ध आहेत. ही बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडीवर जास्तीत जास्त व्याज देत आहे. यात सर्वसामान्य नागरिकांसाठी ७.२६ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.०१ टक्के दराने व्याज दिले जात आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.