15 December 2024 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Stocks To Buy | मल्टिबॅगर आयटीडी सिमेंटेशन इंडिया शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मिळणाऱ्या परताव्यासाठी टार्गेट प्राईज पहा

Stocks To Buy

Stocks To Buy | आयटीडी सिमेंटेशन इंडिया ही कंपनी अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी हेवी सिव्हिल, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आणि सागरी क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीकडे तब्बल 90 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. आयटीडी सिमेंटेशन इंडिया ही कंपनी भारतात व्यवसाय करते, मात्र तिची मूळ कंपनी ही परकीय आहे.

ब्रोकरेज फर्म नुवामाने मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी एक अहवाल जाहीर करून आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासह तज्ञांनी आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीच्या शेअरवर 296 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीचे शेअर्स 2.40 टक्के वाढीसह 205.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीच्या शेअरवर 296 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमत पातळीपासून 52 टक्के अधिक आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 ऑगस्ट 2023 रोजी 3.49 टक्क्यांच्या वाढीसह 196.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19.87 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 132.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2019 ते 2023 या दरम्यान आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीचे शेअर्स 9 टक्के वार्षिक सरासरी किमतीने वाढले आहेत. मार्च 2023 तिमाहीच्या अखेरीस या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 200.4 अब्ज रुपये होता. हे प्रमाण कंपनीच्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या कमाईच्या 3.9 पट अधिक आहे.

नुवामाने ब्रोकरेजने सांगितले की, FY2022 आणि FY2023 मध्ये आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीने 158.5 अब्ज मूल्याची ऑर्डर मिळवली होती. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हंटले आहे की, त्यांच्या अंदाजनुसार कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 200 अब्ज पर्यंत वाढू शकतो. कंपनीने आपले सर्व लक्ष पायाभूत सुविधांवर केंद्रीत केले आहे. कंपनीचा ऑर्डर प्रवाह पुढील कालावधीत सकारात्मक राहील अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीचा ऑर्डर पूर्ण करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड सकारात्मक आहे. आर्थिक वर्ष 2010 ते 2023 दरम्यान कंपनीच्या महसुलात 19 टक्क्यांची समायोजित वाढ नोंदवली गेली होती. आर्थिक वर्ष 2020 ते 2025 मध्ये कंपनीचा EBITDA प्रमाण/ निव्वळ नफा वाढ/ महसूल वाढीचा अंदाज अनुक्रमे 32 टक्के / 47 टक्के / 55 टक्के वाढण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ITD Cementation India Stocks To Buy for investment on 14 August 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x