 
						Infosys Share Price | भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस कंपनीने 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 6212 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती अहवालात दिली आहे. इन्फोसिस कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 3 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
एक वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत इन्फोसिस कंपनीने 6021 कोटी रुपये नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 7 टक्के वाढीसह 38994 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे इन्फोसिस स्टॉक 2 टक्क्यांच्या घसरणीसह 1464.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी इन्फोसिस स्टॉक 2.93 टक्के घसरणीसह 1,422.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच इन्फोसिस या आयटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 18 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय इन्फोसिस कंपनीने आर्थिक वर्ष 2023-2024 साठी गाईडन्समध्ये घट केली आहे. इन्फोसिस कंपनीने असा विश्वास व्यक्त केला आहे की, आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या महसूलात 1-2.5 टक्के वाढ होऊ शकते.
इन्फोसिस कंपनीने यापूर्वी महसूल वाढीचा अंदाज 1-3.5 टक्के व्यक्त केला होता. इन्फोसिस कंपनीने आपल्या महसूल वाढीची अप्पर पातळी कमी केली आहे. परंतु कंपनीने आपले ऑपरेटिंग मार्जिन 20-22 टक्के स्थिर ठेवले आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीप्रमाणे, इन्फोसिस कंपनीच्या अॅट्रिशनमध्ये आणखी घट झाली आहे. या कंपनीचा अॅट्रिशन रेट 14.6 टक्के नोंदवला गेला आहे. जो मागील तिमाहीत 17.3 टक्के नोंदवला गेला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत इन्फोसिस कंपनीने आपली एकूण कर्मचारी संख्या 7530 कमी केली होती.
कंपनीकडे सध्या 328764 कर्मचारी आहेत. 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एम्पलॉयी युटीलायझेशन 80.4 टक्के नोंदवला गेला आहे, जो जून तिमाहीत 78.9 टक्के नोंदवला गेला होता. कंपनीच्या एकूण महसुलात स्थिर चलन बाबतीत वार्षिक आधारावर 7.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		