
IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. अवघ्या एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधां सुधारणावर भारत सरकारने अधिक लक्ष केंद्रित केल्याने या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
मागील काही वर्षांत भारत सरकारने रेल्वे पायाभूत सुविधावर विशेष लक्ष दिले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड स्टॉक 1.35 टक्के वाढीसह 169.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
स्टॉक वाढीचे कारण
21 सप्टेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीला वाराणसी-रांची-कोलकाता ग्रीन फील्ड 6 लेन नॅशनल हायवे बनवण्याचे काम मिळाले आहे. या संयुक्त उपक्रमात रेल विकास निगम कंपनीचा वाटा 49 टक्के असणार आहे. उर्वरित 51 टक्के वाटा टीटीआयपीएलच्या ताब्यात असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे एकूण मूल्य 1271,98,50,000 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही बातमी बाहेर येताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली.
शेअरची कामगिरी
मागील आठवड्यात शुक्रवारी रेल विकास निगम लिमिटेड स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 166.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 373 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 157 टक्क्यांनी वाढवले आहे. रेल विकास निगम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 199.35 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 32.80 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 34,788.56 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.