
Jio Finance Share Price | स्टॉक मार्केट रेग्युलेटरने रिलायन्स ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला (NSE:JIOFIN) म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास मंजुरी दिल्यानंतर या कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.087 टक्के वाढून 343.30 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील १ वर्षात या शेअरने 55.94% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 46.37% परतावा दिला आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला. शेअर मार्केट विश्लेषक गौरांग शाह यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांची रणनीती नेमकी कशी असावी याबद्दल माहिती दिली आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.83 टक्के घसरून 340.95 रुपयांवर पोहोचला होता होता.
तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक गौरांग शहा यांनी सांगितले की, ‘लॉन्ग टर्मसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा शेअर खरेदी करावा. या शेअरसाठी तज्ज्ञांनी ४०० ते ४१५ रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
स्टॉक मार्केट विश्लेषकांनी पुढे म्हटले आहे की, ज्या आधारावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा ताळेबंद वाढत आहे. आणि व्यवसायाचा विस्तार होत आहे आणि अनेक मंजुरी देखील मिळत आहे, ते पाहता हा शेअर पुढे मोठा परतावा देऊ शकतो. भविष्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी चांगली कामगिरी करेल. गुंतवणूकदारांनी 1-2 वर्षांच्या कालावधीसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.
म्युच्युअल फंड क्षेत्रात प्रवेश
गेल्या आठवड्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने सांगितले की, सेबीने कंपनी आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंटला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. जिओ फायनान्शियल आणि ब्लॅकरॉक यांनी जुलै २०२३ मध्ये म्युच्युअल फंड व्यवसायासाठी भागीदारी केली होती आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये नियामक सेबीकडे परवान्यासाठी अर्ज केला होता.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉक कंपनी या कंपन्यांनी जुलै २०२३ मध्ये म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सामंजस्य करार केला होता आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये सेबीकडे मान्यतेसाठी अर्ज केला होता. दरम्यान, मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायासाठी १५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा भारतात या दोन्ही कंपन्यांनी केली होती. त्यानंतर सेबीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंटला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.