KPR Mills Share Price | केपीआर मिल्स शेअरने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले, आता या बातमीने शेअरमध्ये अजून तेजी येणार?

KPR Mills Share Price | केपीआर मिल्स कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षात आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कालावधीत केपीआर मिल्स कंपनीच्या शेअरची किंमत 118 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी केपीआर मिल्स कंपनीच्या शेअर्समधे पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 500 टक्के वाढले आहे. (KPR Mills Share)

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआर मिल्स कंपनीचे शेअर्स 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 676.45 रुपये किमतीवर (KPR Mills Share Price NSE) ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी केपीआर मिल्स कंपनीचे शेअर्स 3.04 टक्के घसरणीसह 655.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (KPR Mills Share Price BSE)

तज्ञांचा सल्ला

ब्रोकरेज फर्म रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी केपीआर मिल्स कंपनीचे शेअर्स 660 रुपये ते 665 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी 625 रुपयेवर स्टॉप लॉस लावून 740 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने KPR मिल्स स्टॉकवर ‘बाय’ टॅग देऊन गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे.

तिमाही कामगिरी

जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत केपीआर मिल्स कंपनीने 1958.03 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 33.99 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत केपीआर मिल्स कंपनीचे निव्वळ उत्पन्न 1461.33 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मार्च 2023 तिमाहीत केपीआर मिल्स कंपनीने 209.55 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात किंचित घट पाहायला मिळाली आहे. KPR मिल्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 680 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 479 रुपये होती. मागील एका वर्षात केपीआर मिल्स कंपनीच्या शेअरची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPR Mills Share Price today on 24 June 2023.