 
						Money Making Stock | EaseMyTrip या प्रवासाशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किट सह 57.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. EaseMyTirp कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे, आणि कंपनी आपल्या विद्यमान शेअर होल्डर्सना बोनस शेअर्सचे ही वाटप करणार आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी एक्स बोनस आणि एक्स-स्टॉक स्प्लिटवर व्यवहार करतील. EaseMyTrip कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 59.56 रुपये आहे.
बोनस शेअरचे प्रमाण :
EaseMyTrip कंपनीच्या शेअरधारकांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले जाणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर मोफत देणार आहे. याशिवाय ट्रॅव्हल कंपनी 1:2 या प्रमाणात स्टॉकचे विभाजन करणार आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 22 नोव्हेंबर 2022 ही निश्चित करण्यात आली आहे. EaseMyTrip प्लॅनर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 29.69 रुपये आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 9813 कोटी रुपये आहे.
दुसऱ्यांदा बोनस शेअर देणार :
EasymyTrip Planners ही कंपनी एका वर्षात दुसऱ्यांदा बोनस शेअर वाटप करणार आहे. यापूर्वी याट्रॅव्हल कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. 28 फेब्रुवारी 2022 ही बोनस शेअर्स वाटपची रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. EasyMyTrip Planners या कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 186-187 रुपये निश्चित करण्यात आली होती. EaseMytrip प्लॅनर्स कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 206 रुपये किमतीवर आणि NSE निर्देशांकावर 212.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. Easy Trip Planners कंपनीच्या शेअर्सनी लिस्टिंगच्या दिवशीच दुहेरी अंकात परतावा मिळवून दिला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		