14 December 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Hero Motocorp Share Price Today | हिरो मोटो कंपनीच्या शेअरने होरो दर्जाचा 1750 टक्के डिव्हीडंड दिला, नफ्याचा शेअर खरेदी करणार?

Hero Motocorp Share Price

Hero Motocorp Share Price| ‘हिरो मोटो कॉर्प’ या दुचाकी आणि तीनचाकी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने गुरुवारी आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. आणि शुक्रवारी हा स्टॉक 1.09 टक्के वाढीसह 2,542.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. हिरो मोटो कॉर्प कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात आपल्या शेअर धारकांना 1750 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने 32 टक्के वाढीसह 805 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. यात कंपनीची निव्वळ विक्री 12.5 टक्क्यांच्या वाढीसह 8434 कोटी रुपयेवर पोहचली आहे.

Hero Motocorp Limited Stock Price Today on NSE & BSE

शेअरची लक्ष किंमत :
हिरो मोटो कॉर्प कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3650 रुपयांपर्यंत वाढू शकतात. ब्रोकरेज फर्म CITI या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 3300 वरून वाढवून 3650 रुपयेवर नेली आहे. Jefferies फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि त्यावर 3,000 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

प्रभदास लिल्लाधर फर्मने कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंगसह 3200 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. जेपी मॉर्गन कंपनी या स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग देऊन स्टॉक 3050 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Morgan Stanley, Goldman Sachs आणि UBS ने या कंपनीच्या स्टॉकवर SELL रेटिंग देऊन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.

लाभांश तपशील :
हिरो मोटो कॉर्प कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 1750 टक्के म्हणजेच 35 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय कंपनीच्या एजीएम बैठकीत होण्याची शक्यता आहे. एजीएमच्या बैठकीत लाभांश वाटपाला मंजुरी मिळाल्यास, 8 सप्टेंबर 2023 पर्यंत शेअर धारकांच्या खात्यात लाभांश जमा केला जाईल.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये हिरो मोटो कॉर्प कंपनीने 135 रुपये लाभांश वाटप केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, या कंपनीने जुलै 2022 महिन्यात 35 रुपये प्रति शेअर पहिला लाभांश वाटप केला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये कंपनीने 65 रुपये लाभांश वाटप केला होता. आणि आता कंपनीने 35 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांना दीर्घ काळात नक्कीच मजबूत फायदा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hero Motocorp Share Price Today on 06 May 2023.

हॅशटॅग्स

Hero Motocorp Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x