 
						Multibagger Stocks | कोणता शेअर कधी वर जाईल आणि कोणता खाली ह्याचा नेम नाही, बघा ना काही काळ पूर्वी 48 पैसे वर ट्रेड करणारा एक शेअर तो आता 1300 रुपये वर ट्रेड करत आहे, तो शेअर म्हणजे अरमान फायनान्शिअल सर्व्हिसेस. हा शेअर 48 पैसे वरून 1300 रुपये वर पोहोचला आहे तब्बल 200000% परतावा ह्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना मिळून दिला आहे.
48 पैसे वरून 1350 रुपये वर ट्रेडिंग:
अरमान फायनान्शिअल ही नॉन-बँकिंग फायनान्स (NBFC) क्षेत्रातील कंपनी आहे. ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला. 48 पैशांवर ट्रेड करणारा हा शेअर 1300 रुपयांपर्यंत वाढला आहे. जर आपण टक्केवारीचा विचार केला तर 48 पैसे वरून 1300 रुपये पर्यंतची वाढ ही तब्बल 200000% आहे. अरमान फिनान्सियल कंपनीच्या शेअर्सने 1387.75 रुपये हा आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. त्याच वेळी, कंपनीच्या शेअरने 603.95 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीच्चतम पातळी गाठली होती.
1 लाख वर तुम्हाला किती परतावा भेटला असता :
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर NBFC कंपनी अरमान फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स ची नोंद 11 मार्च 2004 रोजी झाली होती आणि त्यावेळी शेअर 48 पैशांवर ट्रेड होण्यास सुरवात झाली. 18 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 1350.75 रुपयांवर बंद झाले आणि ही त्या शेअर ने गाठलेली उच्चतम पातळीआहे. जर तुम्ही 11 मार्च 2004 रोजी अरमान फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर तुमची सध्या गुंतवणुकीवर परतावा 28.14 कोटी रुपये झाला असता. सध्याच्या ट्रेडिंग किमतीनुसार अरमान फायनान्शियल सर्व्हिसेसचे मार्केट कॅप म्हणजे बाजार भांडवल 1147 कोटी रुपये आहे.
मागील काही वर्षात झालेली वाढ:
20 जुलै 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर अरमान फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स 25.70 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. मागील 10 वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 52 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. मागील ट्रेडिंग सेशन मध्ये 18 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 52 आठवड्याच्या उच्चतम पातळीवर पोहोचले आणि बीएसईवर 1350.75 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या तुम्ही 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती म्हणजे ते शेअर होल्ड करून ठेवले असते तर सध्या तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 52.55 लाख रुपये परतावा भेटला असता. अरमान फायनान्शिअलच्या शेअर्सने मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांना 36% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर किमतीत सुमारे 71% ची वाढ झाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		