
Multibagger Stocks| आपण या लेखात ज्या कंपनी बद्दल माहिती घेणार आहोत ती आहे, फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेड, ज्याला पूर्वी फोर्ब्स गोकाक लिमिटेड म्हणून ओळखले जात होते. ही जगातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असून अजूनही अस्तित्वात आहे. फोर्ब्स कंपनीचा स्टॉक हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. आणि त्याने फक्त एका वर्षातच गुंतवणूकदारांना 220 टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे.
ठळक मुद्दे :
* फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेड, पूर्वी फोर्ब्स गोकाक लिमिटेड या नावाने ओळखली जात होती.
* मागील एका महिन्यात या शेअर्सनी आपल्या भागधारकांना 111 टक्के परतावा दिला आहे.
* फोर्ब्स कंपनीने 65 रुपये प्रति शेअर म्हणजेच 650 टक्के विशेष लाभांश जाहीर केला आहे.
19 ऑगस्ट रोजी फोर्ब्स अँड कंपनीचे शेअर 10 टक्के अपर सर्किटवर पोहोचले होते. मागील एक वर्षापासून मल्टीबॅगर परतावा देणार्या या शेअर्स नी काल अप्पर सर्किट गाठला होता या जबरदस्त तेजीसह या मल्टीबॅगर स्टॉकने नव नवीन विक्रमी उच्चांक गाठले आहे. आजच्या ट्रेडिंग सेशन च्या शेवटी फोर्ब्स अँड कंपनीचा शेअर बीएसईवर दहा टक्क्यांच्या जबरदस्त उसळीसह 834.35 रुपयांवर जाऊन बंद झाला होता. अवघ्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर जवळपास 90 टक्के वाढला आहे.
फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेड ही जगातील सर्वात जुनी आणि अजूनही अस्तित्वात असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी अभियांत्रिकी वस्तू, औद्योगिक ऑटोमेशन, ग्राहक टिकाऊ वस्तू, जसे की जल आणि हवाई वाहतूक उत्पादने, रासायनिक टँकर उत्पादन आणि रिअल इस्टेट उद्योगमध्ये सक्रिय आहे. फोर्ब्स अँड कंपनी शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचा भाग आहे. फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेडचे महाराष्ट्रात औरंगाबाद, ठाणे आणि मुंबई, तामिळनाडूमध्ये होसूर या ठिकाणी उत्पादन केंद्र आहेत.
एका वर्षात 220 टक्के परतावा :
फोर्ब्स अँड कंपनीचा स्टॉक दीर्घकाळापासून आपल्या भागधारकांना मालामाल बनवत आला आहे. मागील एका महिन्यात या शेअर्सने आपल्या भागधारकांना तब्बल 111 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे, मागील सहा महिन्यांत या शेअर्स मध्ये 115.54 टक्के वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. 2022 म्या चालू वर्षात फोर्ब्सच्या स्टॉकने आतापर्यंत 159 टक्के उसळी घेतली आहे. मागील एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 220 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
लाभांश जाहीर :
फोर्ब्स कंपनीने आपल्या भागधारकांना 65 रुपये प्रति शेअर या दराने म्हणजेच 650 टक्के विशेष लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. लाभांश जाहीर झाल्यापासून या शेअर्स मध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. 13 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत विशेष लाभांश जाहीर केला होता. यासाठी 25 ऑगस्ट 2022 ही रेकॉर्ड तारीख ठरवण्यात आली आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या संचालक मंडळाने “मॅकसा आयडी” सोबत संयुक्त उपक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.