
Olatech Solutions Share Price | ‘ओला टेक सोल्युशन’ या स्मॉल कॅप कंपनीचा IPO भारतीय दुय्यम बाजारात गाजलेला एक मल्टीबॅगर IPO ठरला होता. या SME कंपनीचा IPO इश्यू ऑगस्ट 2022 गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 27 रुपये निश्चित केली होती. ओला टेक कंपनीचा IPO स्टॉक 29 ऑगस्ट 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीच्या शेअरने 51.30 रुपये ही उच्चांक पातळी स्पर्श केली होती. ज्यां लोकांना या स्टॉकचे वाटप झाले होते, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 90 टक्के नफा झाला होता. तथापि या SME शेअरची किंमत दिवसा अखेर 53.85 रुपये पर्यंत पोहचली होती. आज गुरूवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 85.80 रुपये किमतीवर ट्रेडिंग थांबली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Olatech Solutions Share Price | Olatech Solutions Stock Price | BSE 543578)
ओला टेक या SME कंपनीच्या मल्टीबॅगर IPO स्टॉक ने अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या स्मॉल-कॅप स्टॉकने बंपर लिस्टिंगनंतर आणखी तेजी पकडली आणि बीएसई एसएमई निर्देशांकावर शेअरची किंमत 133.20 रुपयांवर पोहोचली होती. तथापि विक्रीच्या दबावामुळे शेअरची किंमत आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 85.80 रुपयेवर आली आहे. ज्या लोकांना या कंपनीचे IPO स्टॉक वाटप झाले होते, त्यांनी अवघ्या 5 महिन्यांत 200 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे.
5 महिन्यांत पैसे 3 पट वाढले :
ओला टेक या SME कंपनीचा IPO ऑगस्ट 2022 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीने IPO मध्ये आपल्या शेअरची किंमत बंद 27 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉटसाठी बोली लावण्याची परवानगी होती. कंपनीने एक लॉटमध्ये 4000 शेअर्स जरी केले होते. ज्या लोकांनी या SME कंपनीच्या IPO मध्ये अर्ज केला होता त्यांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1.08 लाख रुपये खर्च करावे लागले होते. ओला टेक कंपनीचा IPO 29 ऑगस्ट 2022 रोजी BSE-SME निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आला होता.
जर तुम्ही ओला टेक कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट साठी अर्ज केला असता आणि तुम्हाला जर IPO स्टॉक वाटप झाले असते तर आज तुमच्या 1.08 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.43 लाख रुपये झाले असते. भारतीय शेअर बाजारात असे अनेक SME कंपनीचे स्टॉक्स आहेत ज्यात पैसे लावून गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली आहे. हे पेनी स्टॉकचे कालांतराने मल्टीबॅगर्स होतात आणि गुंतवणुकदार करोडपती होतात. मात्र अशा स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.