Mankind Pharma IPO | प्रसिद्ध मॅनकाइंड फार्मा कंपनी लवकरच IPO लाँच करणार, गुंतवणुकीची सुवर्ण संधी मिळणार
Mankind Pharma IPO | IPO मार्केटमध्ये लवकरच एका प्रसिद्ध कंपनीची एन्ट्री होऊ शकते. मॅनकाइंड फार्मा ह्या कंपनीने आपला IPO आणण्याचे जाहीर केले आहे, आणि त्यासाठी कारवाई पूर्ण केली आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीचे नाव आपण सर्वांनी एकले असेल. ही कंपनी “मॅनफोर्स कंडोम” बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. मॅनकाइंड फार्मा लवकरच आपला आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने त्यासाठी मार्केट रेग्युलेटरी बोर्ड SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP पेपर्सचा प्रस्ताव दाखल केला आहे. या IPO मध्ये कंपनीचे प्रोमोटर्स आपल्या कंपनीचे 40,058,844 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल जाहीर करतील. IPO चा आकार सुमारे 5,500 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
4 कोटी शेअर्सची IPO ऑफर :
Mankind Pharma कंपनी आपल्या IPO मध्ये कंपनीच्या प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे 40,058,844 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल बाजारात घेऊन येतील. आणि त्यातून कंपनी सुमारे पाच हजार कोटीचा फंड जमा करतील. रमेश जुनेजा, राजीव जुनेजा, शीतल अरोरा, रमेश जुनेजा फॅमिली ट्रस्ट, राजीव जुनेजा फॅमिली ट्रस्ट आणि प्रेम शीतल फॅमिली ट्रस्ट हे या फार्मा कंपनीचे संचालक आहेत.
5,500 कोटींचा IPO :
SEBI ला दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार IPO चा आकार सुमारे 5,500 कोटी रुपये असेल. भारतातील फार्मा कंपनीच्या सेक्टरमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असण्याची शक्यता आहे. या IPO ऑफरमधून मिळालेली संपूर्ण रक्कम शेअरहोल्डर्सने ऑफर फॉर सेलमध्ये ऑफर केलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात विक्री करणाऱ्या शेअरधारकांमध्ये वितरीत केली जाईल. आणि कंपनी DRHP नुसार IPO ऑफरमधून कोणतेही भांडवल उभारणार नाही.
कंपनीबद्दल सविस्तर माहिती :
1991 साली स्थापन झालेल्या मॅनकाइंड फार्मा कंपनी ने भारतातील अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीच्या यादीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांव्यतिरिक्त, कंपनीच्या आघाडीच्या ब्रँडमध्ये प्रेगा-न्यूज प्रेग्नन्सी टेस्टिंग किट, मॅनफोर्स कंडोम, गॅस-ओ-फास्ट आयुर्वेदिक अँटासिड आणि मुरुमांवर उपचार करणारे औषध Acnestar यां सर्व ब्रँड प्रॉडक्ट्सचा समावेश होतो. 31 मार्च 2022 पर्यंत, कंपनीकडे सध्या हिमाचल प्रदेश, सिक्कीम, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसह संपूर्ण भारतात 23 पेक्षा अधिक उत्पादन सुविधा केंद्र आहेत.
कंपनीची आर्थिक स्थिती :
2020, 2021 आणि 2022 या आर्थिक वर्षांत या कंपनीने भारतातील उद्योगातून अनुक्रमे 5,788.8 कोटी, 6,028 कोटी आणि 7,594.7 कोटी रुपये महसूल कमावला आहे. भारतानंतर, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ ही या कंपनीची प्रमुख बाजारपेठ आहेत. 2015 मध्ये, कॅपिटल इंटरनॅशनलने क्रिस्कॅपिटलकडून 200 दशलक्ष डॉलर्समध्ये मॅनकाइंड फार्मामधील 11 टक्के स्टॉक खरेदी केला होता. एप्रिल 2018 मध्ये, क्रिस्कॅपिटलने पुन्हा 350 दशलक्षमध्ये 10 टक्के स्टेक विकत घेतला.
गुंतवणूक नियोजन :
2022 या वर्षी एप्रिलमध्ये, मॅनकाइंड फार्माने अॅग्रीटेक सेगमेंटमध्ये उद्योग करण्यासाठी मॅनकाइंड अॅग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड फर्म स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आणि कंपनीने पुढील दोन ते तीन वर्षांत कृषी क्षेत्रात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये मॅनकाइंड फार्माने Panacea Biotech फार्मा कंपनीचे फॉर्म्युलेशन ब्रँड 1872 कोटीं रुपयात विकत घेतले आहे. उद्योग कराराच्या अनुषंगाने, मॅनकाइंड फार्मा Panacea Biotech फार्मा या कंपनीला विक्री आणि विपणन संघातून काढून अन्य व्यवसायात पुढे नेण्याचा विचार करेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| IPO investment of Mankind Pharma will launch soon for investment on 17 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News