 
						Penny Stocks | शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. आशियाई शेअर बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही घसरण दिसून आली. शुक्रवारी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स 91.11 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी घसरून 66,175.71 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर एनएसईचा निफ्टी 22.15 अंकांनी घसरून 19,637.75 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजार शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात लाल चिन्हासह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १०६ अंकांनी घसरून ६६,१६० वर बंद झाला, तर निफ्टी १४ अंकांनी घसरून १९४६१ च्या पातळीवर बंद झाला.
शुक्रवारी निफ्टीत एनटीपीसीचे शेअर्स सर्वाधिक चार टक्क्यांनी वधारून बंद झाले, तर पॉवर ग्रिडचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये जवळपास २ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅपमध्ये किंचित वाढ दिसून आली. निफ्टीवर रिलायन्स, डॉ. रेड्डीज लॅब्स आणि सिप्ला यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह आणि हिंडाल्को यांचे शेअर्स घसरले.
पेनी शेअर्सची यादी
२७ जून रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ३,८७९ कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) २,५२८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. जर तुम्हालाही शेअर बाजारात काम करून पैसे कमवायचे असतील तर आम्ही तुम्हाला त्या 10 शेअर्सबद्दल सांगत आहोत ज्यांनी शुक्रवारी कमजोर बाजारात सुद्धा एकदिवसात 5% च्या अप्पर सर्किटला स्पर्श केला.
* एचडी लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड
* शिवांश फिनसर्व्ह
* किरण सिंटेक्स
* राठी स्टील
* आशीर्वाद कॅपिटल
* अभिषेक इन्फ्राव्हेंचर
* वसुधा गामा एंटरप्रायजेस
* ट्राय पॉट्स
* डामर पोर्टेबल हाऊसिंग
* सिंड्रेला फायनान्शियल सर्व्हिसेस

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		