
PPF Vs Mutual Fund | प्रत्येकाची गुंतवणूकीची पद्धत आणि युक्ती आर्थिक गटांनुसार बदलत जाते. वेगवेगळ्या लोकांचे गुंतवणुकीचे नियमही वेगवेगळे असतात. कारण, प्रत्येकाचे पैसे कमावण्याची आणि बचत करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक जोखमीची काळजी न करता, बिनधास्त गुंतवणूक करतात, मात्र काहीजण ‘सेफ गेम’ खेळतात.
आजकाल लोक अल्पावधीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात. परिणामी PPF आणि Mutual Fund हे गुंतवणूक पर्याय नेहमी लोकांच्या पसंतीचे राहिले आहेत. पण, या पर्यायांमध्येही काही प्रमाणात जोखीम आणि काही फायदे देखील आहेत, जे आपण आज या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
PPF :
ही एक अशी गुंतवणूक योजना आहे, जी आपल्याला दीर्घकाळात मजबूत परतावा कमावून देऊ शकते. PPF योजना भविष्यातील बचतीसाठी खूप फायद्याची ठरते. सोबतच या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर सवलतीचा ही लाभ घेता येतो. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना डिपॉझिट केलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. हा व्याज परतावा पूर्णपणे करमुक्त आहे.
PPF योजनेचे फायदे थोडक्यात :
* योजनेतील गुंतवणुकीवर भारत सरकारद्वारे सुरक्षा हमी प्रदान करण्यात येते,
* आयकर कायदा सेक्शन 80 C अंतर्गत कर सूट मिळते,
* किमान 500 रुपयांपासून गुंतवणूकीची सुरुवात करता येते,
म्युचुअल फंड :
म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुकदार जे पैसे लावतात, हे पैसे काही निष्णात मंडळीकडून शेअर बाजारात आणि अन्य ठिकाणी गुंतवले जातात. म्युचुअल फंड योजनेतील सर्व गुंतवणुकदारांचे पैसे हे तज्ञ मंडळी त्यांच्या अनुषंगाने विविध कंपनीच्या स्टॉकमध्ये, सोन्यात, रोख्यात, किंवा सरकारी योजनेत पुन्हा गुंतवतात.
म्युचुअल फंड योजनेचे फायदे थोडक्यात :
* म्युचुअल फंड मध्ये तुम्ही जे पैसे लावता ते पैसे जाणकार लोकांकडून हाताळले जातात.
* या योजनेत तुम्ही एकरकमी किंवा एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करू शकता.
* अगदी तुटपुंज्या रक्कमेने या योजनेत गुंतवणूक करता येते.
म्युच्युअल फंडबद्दल थोडक्यात :
म्युचुअल फंड योजना तुम्हाला सरासरी वार्षिक 10 ते 12 टक्के व्याज परतावा कमावून देऊ शकतात. समजा तुम्ही दर महिन्याला 10 हजार रुपयांची SIP गुंतवणूक करत आहात, आणि त्यावर तुम्हाला 12 टक्के दराने व्याज परतावा मिळत असेल तर 20 ते 21 वर्षांत तुम्हाला करोडो रुपयांचा परतावा मिळू शकतो. पीपीएफ योजनेची मुदत पूर्ण होण्याआधी तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून करोडपती झाला असाल. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या दोन्ही योजनेत गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज लागत नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.