28 April 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर्स तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूक करून फायदा उचला

Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आले होते. लिस्टिंग झाल्यापासून पेटीएम कंपनीच्या शेअर्सवर जबरदस्त दबाव पाहायला मिळाला आहे. आता मात्र पेटीएम कंपनीच्या गुंतवणूकदारांना किंचित प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 2,150 रुपये या इश्यू किमतीच्या तुलनेत खूप खाली ट्रेड करत आहेत.

मात्र स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 80 टक्के मजबूत झाला आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 439.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 809.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.59 टक्के वाढीसह 833.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी पेटीएम कंपनीच्या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांनी मजबूत झाले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज फर्मने 885 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केल्यामुळे पाहायला मिळत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. परकीय ब्रोकरेज फर्म CLSA ने देखील पेटीएम कंपनीच्या शेअर्सवर 850 रुपये लक्ष्य किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

पेटीएम कंपनीच्या व्यवस्थापनाला देखील कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ होण्याची अपेक्षा आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या तज्ञांनी म्हंटले आहे की, मजबूत महसूल वाढ, ऑपरेशनल लीव्हरेजमध्ये अपेक्षित वाढ आणि मर्यादित स्पर्धा यामुळे पेटीएम कंपनीच्या स्टॉकवर रिस्क रिवॉर्ड अधिक सकारात्मक पाहायला मिळत आहे.

मार्च तिमाहीच्या निकालांवरून असे कळते की, पेटीएम कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा खूप घटला आहे. आणि कंपनीच्या एकत्रित महसूलात देखील 52 टक्के वाढ झाली आहे. पेटीएम कंपनीच्या व्यवस्थापनाचे माहिती दिली आहे की, त्यांना कंपनीच्या महसुलात मजबूत वाढीची अपेक्षा आहे. आणि सप्टेंबर 2023 पर्यंत EBITDA ब्रेक-इव्हन साध्य करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पेटीएम कंपनीने निश्चित केले होते.

मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 476.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 809.45 रुपये किमतीवर पोहचले आहेत. पेटीएम शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 844.70 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 438.35 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price today on 13 June 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x