
RailTel Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. BSE सेन्सेक्स 600 अंकाच्या घसरणीवसह आणि NSE निफ्टी-50 निर्देशांक 200 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारातील स्मॉल कॅप निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक विक्रीच्या दबावात आले होते. मात्र गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती.
गुरुवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, रेल विकास निगम, इरकॉन इंटरनॅशनल, आयआरसीटीसी आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यासारख्या दिग्गज रेल्वे कंपन्यांचे शेअर्स 11 टक्क्यांपर्यंत वाढले होते. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 11.4 टक्के वाढीसह 442 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 9.69 टक्के वाढीसह 435.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या डिसेंबर तिमाहीत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचा नफा वर्ष-दर-वर्ष आधारावर दुप्पट झाला आहे. याकाळात कंपनीच्या शेअर्समध्ये देखील मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 62 कोटी रुपये PAT कमावला आहे. मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीचा PAT जवळपास 2 पट अधिक नोंदवला गेला आहे. रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला नुकताच नवोदय विद्यालय समितीने 162 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर दिल्या आहेत.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्या संबंधित घोषणेच्या अपेक्षेने रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स देखील गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.5 टक्क्यांच्या वाढीसह 252 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जानेवारी 2024 या महिन्यात IRCON इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची किंमत 44 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 325 टक्के परतावा कमावून दिला आहे.
आयआरएफसी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये चार टक्क्यांच्या वाढीसह 178 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.25 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील एका महिन्यात IRFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात IRFC कंपनीच्या शेअर्सची किंमत 441 टक्के वाढली आहे.
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये चार टक्क्यांनी वाढले होते. मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स गुरुवारी दोन टक्क्यांच्या वाढीसह 990 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर टिटागड रेल कंपनीचे शेअर्स गुरूवारी 2.5 टक्के वाढीसह आणि टॅक्समेको इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 4.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.