14 December 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Sterling and Wilson Share Price | रिलायन्सची गुंतवणूक! या शेअरने 6 दिवसात 28% परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Sterling and Wilson Share Price

Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरूवारी 5 टक्के अप्पर सर्किटसह 576.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे.

स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 253.45 रुपये होती. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 577.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

डिसेंबर 2023 तिमाहीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीमधील आपला वाटा मागील तिमाहीपासून वाढवून 8 टक्केवर नेला आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीमध्ये या कंपनीत FII ने 3.38 टक्के भाग भांडवल धारण केले होते. Goldman Sachs Fund-Goldman Sachs India Equity Portfolio कडे स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे 1.22 टक्के भाग भांडवल आहेत. East Bridge Capital Master Fund I Ltd कडे या कंपनीचे 1.24 टक्के भाग भांडवल आहेत. आणि Two Capital Ltd कडे स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे 1.52 टक्के भाग भांडवल आहेत.

18 जानेवारी 2024 रोजी स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीने आपले डिसेंबर 2023 च्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. कंपनीचे महसूल संकलन वार्षिक आधारावर 99.15 कोटी रुपयेवरून घसरुन 62.39 कोटी रुपयेवर आले आहे. मात्र कंपनीचे एकूण उत्पन्न 46 टक्के वाढीसह 610.31 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 417.65 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

ब्रोकरेज फर्म नुवामाने स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईस 620 रुपये निश्चित केली आहे. स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीने मागील काही काळात आपले कर्ज 27 दशलक्ष रुपयेपर्यंत कमी केले आहे. यासह कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 2,400 कोटीच्या पार गेला आहे. स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये क्यूआयपीद्वारे 1,500 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी ही कंपनी मुख्यतः एंड-टू-एंड नूतनीकरणयोग्य अभियांत्रिकी आणि बांधकाम उपायां संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी मुख्यतः भारत, आग्नेय आशिया आणि इतर 29 देशांमध्ये आपल्या सेवा प्रदान करते.

या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 52.98 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड कंपनी देखील सामील आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड कंपनीने स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीसह भागीदारी केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sterling and Wilson Share Price NSE Live 27 January 2024.

हॅशटॅग्स

Sterling and Wilson Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x