
Safari Industries Share Price | सफारी इंडस्ट्रीज या ट्रॉली बॅग आणि ट्रॅव्हल बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांपासून कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून आता 3000 रुपयेवर पोहचले आहेत. सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी या काळात आपल्या गुंतवणुकदारांना 1,45,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 3042 रुपये होती. तर सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 879.90 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के वाढीसह 3,005.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सफारी इंडस्ट्रीज शेअरची कामगिरी
11 जून 2004 रोजी सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात ज्या लोकांनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 14 कोटी रुपये झाले आहे. 15 जून 2023 रोजी सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2949 रुपये किमतीवर पोहोचले होते.
सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत गुंतवणुकदारांना 1,46,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 11 जून 2004 रोजी सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.74 कोटी रुपये झाले असते.
10 वर्षात दिला 4000 टक्के परतावा
मागील 10 वर्षात सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर वाढ पाहायला मिळाली आहे. 7 जून 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 71 रुपयेवर ट्रेड करत होते. तर सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 15 जून 2023 रोजी 2949 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
या कालावधीत सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्स लोकांना 4030 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 41.53 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.