नॅशनल पार्क व आरे: अप्रत्यक्ष हा होईना, आदित्य ठाकरेंना ब्लूप्रिंट'मधील राज यांचा तो मुद्दा पटला असावा: सविस्तर

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्याउपस्थितीत १,१०० एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
जंगलात शहरं उभारण्यापेक्षा सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात हिरवळ उभी करणं मानवतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, सिमेंटच्या टॉवरपेक्षा झाडांचे टॉवर उभे करा, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. वसंत लॉनतर्फे अंधेरी-मरोळ या ठिकाणी माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या पुढाकाराने तब्बल ११०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आला. दरम्यान मरोळ आरे कॉलनीत सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या स्थानिक नागरीकांनी आणि समाज सेवी संस्थांनी या निवडणुकीच्या काळात येणाऱ्या वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमांवर संताप व्यक्त केला आहे. कारण आरे मधील वास्तव त्यांनी उघड्या डोळ्याने पाहिलं आहे. मात्र असं असलं तरी अप्रत्यक्ष का होईना, आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांनी सादर केलेल्या ब्लू प्रिंटमधील मुंबईतील जंगलांसंबंधित आणि आरे कॉलनी संबंधित विषयच गंभीर पटलं असावं असंच म्हणावं लागेल. कारण स्वतःचाच सरकारमध्ये बिल्डर धार्जिणे धोरण राबवले जात असताना, स्वतःवरच अशी विधानं करण्याची वेळ आली आहे.
‘मेट्रो’साठी आतापर्यंत मुंबईतील तब्बल ६३०३ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामध्ये तोडण्याची मंजुरी घेतलेल्या २८०१ झाडांव्यतिरिक्त आणखी ३५०३ झाडे तोडण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाच्या या धोरणाविरोधात ही वृक्ष नष्ट करण्याची प्रक्रिया मागील ४-५ वर्षांपासून सुरु आहे. बहुमताने सत्तेत असून देखील यात शिवसेना हतबल असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘एमएमआरसी’कडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशा ३२.५ कि.मी. ‘मेट्रो-३’ मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे, मात्र या मार्गात येणाऱया झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल सुरू आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला पालिकेकडून फक्त २८०१ झाडे तोडण्याची मंजुरी घेण्यात आली. मात्र त्यानंतर ‘मेट्रो’कडून वेळोवेळी कामासाठी झाडे तोडण्याची निकड व्यक्त करून मंजुरी मिळवण्यात येते. त्यामुळे अशी अतिरिक्त झाडे तोडल्याचा आकडा तब्बल ३५०३ वर गेला आहे.
मे २०१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘मेट्रो’ने पालिकेकडून २८०१ झाडे तोडण्यासाठी मंजुरी मिळवली. त्यानंतर ‘मेट्रो’च्या १५ स्थानकांसाठी २१४ झाडे तोडण्यात आली. आरे इलेक्ट्रिक टॉवर शिफिंगसाठी १३७, आरे कारशेडसाठी ३०७, यार्डसाठी ५४ अशी झाडे तोडण्यात आली. यानुसार मंजुरी घेतलेली – २८०१, अतिरिक्त – ३४२६ तर मुंबई सेंट्रल येथील आणखी ७६ अशी मिळून ६३०३ झाडे आतापर्यंत तोडण्यात आली.
सरकारच्या वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत मुंबईत प्रतिवर्षी ६,००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु यामध्ये लावलेली किती झाडे जगतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. ‘वन’ धोरणानुसार लोकवस्तीच्या ३५ टक्के भाग हा झाडांनी व्यापलेला असावा. मात्र मुंबईतील हे प्रमाण केवळ २० टक्के असल्याचे सिद्ध झालं आहे. मुंबईच्या दीड कोटी लोकसंख्येचा विचार करता मुंबईत असलेल्या २९७५२२८ झाडांनुसार पाच माणसांमागे फक्त एक झाड आहे. कॅनडामध्ये हेच प्रमाण प्रतिमाणसामागे – ८९५३ झाडे, ब्राझील – १२९३, चीन – ११०२ असे प्रमाण आहे. त्यामुळे या वृक्षतोडीविरोधात स्थानिकांसह अनेक पर्यावरणवादी संस्थांनी आक्षेप घेतला होता, तर स्थानिक नागरिकांनी मोर्चे काढले होते.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुंबईचा विकास आराखडा मंजूर केला होता, त्या आराखड्यामध्ये नैसर्गिक क्षेत्र आणि मोकळ्या जागांसाठी नव्या कोणत्या योजना आखल्या आहेत, त्याबद्दल कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही. त्यात नैसर्गिक क्षेत्रांना संरक्षण देण्याचा मुद्दा आहे. पण वास्तविक या हरित पट्यात पुनर्वसनच्या नावाने अतिक्रमण अधिक होतील अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की, राज्य सरकारकडे मुंबईसाठी नैसर्गिकदृष्ट्या महत्वाचा असा हरित पट्टा म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी मधील अतिक्रमण रोखणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईसाठी नैसर्गिकदृष्ट्या महत्वाच्या हरित पट्यात अतिक्रमण होणार नाही याची खात्री स्वतः राज्य सरकारसुद्धा देणार नाही अशी शंका पर्यावरण तज्ञ व्यक्त करत आहेत.
अनेक मान्यवर निसर्ग तज्ञ हा विकास आराखडा म्हणजे बिल्डर धार्जिणा असल्याचे मत व्यक्त करत असून, केवळ निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना आमिष दाखविण्याचा प्रयत्नं केला गेला आहे असं परखड मत व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे आर्किटेक्ट उल्हास राणे म्हणाले होते की, मुंबईच्या नव्या विकास आराखड्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती बफर म्हणून पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची आखणी करणे अपेक्षित होते. याची निर्मिती करण्यात आली आहे का? मुंबईमध्ये इतर ठिकाणी हरितपट्ट्यांची योजना आखली आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.
उल्हास राणे यांच्या मते एफएसआय वाढवताना हरितपट्टेही त्या प्रमाणात वाढवणे अपेक्षित आहे. मोकळ्या जागा, हरितपट्टे वाढले नाहीत तर मुंबईकरांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे आणि त्याचे भयंकर नैसर्गिक दुष्परिणाम भविष्यातील पिढीला भोगावे लागतील अशी भीती अनेक पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. सरकारची नैसर्गिक क्षेत्रांची आणि मोकळ्या जागांची आकडेवारी ही केवळ कागदावरच दिसेल असं परखड मत अनेक मान्यवर मांडत आहेत.
अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक पंकज जोशी म्हणाले होते की, ‘मुंबईच्या विकास आराखड्यातील मोकळ्या जागा मुळात सामान्यांना उपलब्ध आहेत का’, असा मुलभूत प्रश्न उपस्थित केला होता. एकूणच मुंबईचा विकास करताना त्याच मुंबईचा हरित पट्टाच विकासाच्या नावाखाली भक्षस्थानी पडण्याची शक्यता अधिक आहे आणि तसा इतिहास आहे.
राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या ब्लू-प्रिंट मध्ये न्यूयॉर्क मधल्या मॅनहॅटन शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या सेंट्रल पार्कची केसस्टडी जनतेसमोर मांडली होती. एकूण ७७८ एकर इतकं मोठ क्षेत्रफळ त्या मॅनहॅटनमधील सेंट्रल पार्कच आहे. तर दुसरीकडे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १०४ चौरस किलो मीटर म्हणजे न्यूयॉर्क मधल्या सेंट्रल पार्क सारखी तब्बल ३० पार्क बसतील इतका मोठा नैसर्गिक वारसा मुंबईला लाभला आहे हे तेंव्हा कळलं. विशेष म्हणजे मॅनहॅटनमधील सेंट्रल पार्क हे तिथल्या लोकांना निसर्गात मोकळा श्वास घेता यावा म्हणून एकत्र येऊन उभाराव लागलं होत, परंतु मुंबईकरांना ते निसर्गानेच दान दिलं आहे याची साधी कल्पना सुद्धा मुंबईकरांना नाही, हेच दुःख अनेक पर्यावरण प्रेमी व्यक्त करतात.
एकूणच २०१४ मध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सादर केलेल्या ब्लू-प्रिंट मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे यांचं महत्व पटवून दिल होतं. परंतु त्याच वेळी २५ वर्ष जुनी शिवसेना – भाजपाची युती तुटली आणि सामान्य मुंबईकर त्यांच्या राजकीय झोंबा-झोंबीवर केंद्रित झाला, जो प्रकार आजही सुरूच आहे. आज त्याच युती सरकारच्या ‘राजकीय झोंबाझोंबी’तुन मुंबईचा बिल्डर धार्जिणा नवीन विकास आराखडा जन्माला आला आहे. पर्यावरणाचं त्यात महत्व किती ते येणार काळच ठरवेल.
परंतु राज ठाकरेंच्या ब्लू-प्रिंट सारखे शहर आणि गावांसाठी पोषक ठरणारे विषय दुर्लक्षित करून आणि ‘युतीच्या राजकीय झोंबाझोंबी’कडे आकर्षित होऊन, सामान्य मुंबईकर हा स्वतःच आणि स्वतःच्या पुढच्या पिढीचं आयुष्य कसं गुदमरेल याची तरतूद स्वतःच करत आहे असच काहीसं चित्र आहे. माझं शहर निसर्गाविना ‘मेलं’ तरी चालेल, पण मी ज्या पक्षाचा चाहता आहे, त्या पक्षाच्या नेत्याच काही ठोस कर्तृत्व नसेल तरी त्याचा ‘जय-जय-कार’ होणं अधिक महत्वाचं आहे हे तरुण पिढीला वाटण सुद्धा भविष्यात खूप घातक ठरू शकत. कारण त्यातूनच त्यांची शहराच्या निसर्गाप्रती असलेली उदासीनता लक्षात येते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC