अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार असेल
रायगड, ८ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.
त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून आता तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी रायगड आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त टीमने त्यांच्या राहत्या घरातून सकाळी अटक केली होती. तिथून त्यांना थेट अलिबाग येथे नेण्यात आले होते. तिथे कोर्टात हजर केले असतान त्यांना १४ दिवसांची कोर्ट कस्टडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना कोरोना अडचणीच्या अनुषंगाने अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते.
दरम्यान, यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जवाबदार असेल असं म्हटलं.
अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण हायकोर्टात असून देखील वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. महाराष्ट्र सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल,” असं म्हणत खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.
#ArnabGoswami यांचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असूूूूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल. pic.twitter.com/BSH79hpNOh
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 8, 2020
News English Summary: Accordingly, Arnab Goswami has been sent to the Taloja Jail from the Marathi School Upakaragriha in Alibag. Arnab Goswami, editor of Republic TV, was arrested by a joint team of Raigad and Mumbai police from his residence on November 4 in connection with the Naik suicide case. From there they were taken directly to Alibag. He was remanded in court custody for 14 days. Since then, Arnab Goswami was kept in the upakarigraha of a Marathi school in Alibag due to the Corona problem. Meanwhile, Bharatiya Janata Party (BJP) MP Narayan Rane attacked the Thackeray government, saying the entire state government would be held responsible if any threat was made to Arnab Goswami’s life.
News English Title: BJP MP Narayan Rane criticized MahaVikas Aghadi government over shifting Arnab Goswami to Taloja Jail News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News