आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य | मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका

मुंबई, २६ ऑगस्ट : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.
सोनिया गांधींनी बैठकीत सर्वप्रथम जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सध्या नीट-जेईई परीक्षा घेणे सुरक्षित नाही. जर केंद्र सरकार प्रयत्न करत नसेल तर सर्व राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी.
सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत कोरोनासह विविध विषयांवर चर्चा झाली. कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक केले. तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी केलेल्या कौतुकाचे आभार मानत मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की त्यांना घाबरून राहायचं हे आधी ठरवलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी या बैठिकित मांडले.
आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य असा टोला केंद्र सरकारच्या भूमिकेवरुन त्यांनी लगावला. तसंच जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आणि जर तो दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो अजून बुलंद करणं आपलं कर्तव्य आहे असंही यावेळी ते म्हणाले. या बैठकीत काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले.
News English Summary: CM Uddhav Thackeray blamed the central government for the sin that we committed and the virtue that we committed. He also said that no one can suppress the voice of the people, and if there is an attempt to suppress it, it is our duty to make it louder.
News English Title: CM Uddhav Thackeray slams Modi Government during 7 states chief ministers meeting News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Dhampure Speciality Sugars Share Price | 5 दिवसात या शेअरने 43% परतावा दिला, झटपट परतावा देणारा शेअर 38 रुपयाचा, खरेदी करावा?
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
-
Quality Foils India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, IPO स्टॉकची ग्रे मार्केट कामगिरी पाहा
-
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
-
Voltamp Transformers Share Price | जबरदस्त! 225 टक्के परतावा देणारा हा शेअर तेजीत वाढतोय, ही आहे टार्गेट प्राईस
-
Safe Money Investment | हे आहेत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय, तुमचा पैसा बुडण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा