14 May 2025 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL
x

मुंबई महानगरपालिका समिती अध्यक्ष अमेय घोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

Corona report, Corporator Ameya Ghole, Covid19 positive

मुंबई, २१ जुलै : कोरोनाविरोधात चार महिने प्रदीर्घ लढा दिल्यानंतर आता मुंबई सावरत असल्याची सकारात्मक बाब समोर येत आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर तब्बल ५७ दिवसांवर पोहोचला असून बरे झालेल्या रुग्णांचा दर ७१ टक्के आहे. याशिवाय, आतापर्यंत ७२,६४८ रुग्ण कोविडमुक्त झाले.

मुंबईत सध्या २३,७२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत सोमवारी १०३५ रुग्णांची तर ४१ मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची संख्या १,२४,०२३ वर पोहोचली असून एकूण मृत्यू ५,७५५ एवढे झाले आहेत. अन्य कारणांमुळे २९२ रुग्णांचे मृत्यू झाले.

दरम्यान, आज मुंबई महानगर पालिेका समिती अध्यक्ष आणि नगरसेवक अमेय घोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. पुढील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमेय घोले हे गेले ४ महिने बीएमसीच्या सर्व हाँस्पिटल आणि कोविड केअर सेंटर मधील रुग्णांच्या नियोजनात व्यस्त होते. सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात राहील्यामुळे करोनाचा संसर्ग झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची फोनवरुन चौकशी केली. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना याबद्दलची माहिती दिली. गेल्या ३-४ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. घाबरुन जाऊ नये असा संदेश त्यांनी पाठवला.

 

News English Summary: Today, the corona report of Mumbai Municipal Corporation committee chairman and corporator Ameya Ghole came positive. He was taken to Seven Hill Hospital for further treatment. For the last 4 months, Ameya Ghole has been involved in the planning of patients in all BMC hospitals and Covid Care Centers.

News English Title: Corona report of Mumbai Municipal Corporation Committee Chairman and Corporator Ameya Ghole is positive News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या