मुंबई : २७ ला जुलै शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त शिवसैनिक त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच रस्त्यावर होर्डिंग्ज लावून शुभेच्छा देतात. मात्र पक्ष प्रमुखांनी या उधळपट्टीला आळा घालून कार्यकर्त्यांनी तो पैसा सामाजिक उपक्रमांसाठी वापरावा असा संदेश दिला आहे.

याविषयी उद्धव ठाकरे यांनी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे लावू होर्डिंग्ज नकोत, तसेच पर्यावरणाला हानी पोहोचेल अशी कोणतीही गोष्ट करू नका, अस भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले आहे. तसेच पुष्पगुच्छ आणि महागडे होर्डिंग्जचे पैसे तुम्ही सामाजिक उपक्रमांसाठी वापर, असं देखील म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मते पैसे व्यर्थ खर्च करण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करा. हे पैसे सामाजिक उपक्रमासाठी वापरल्याने सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल. तसेच योग्य ती मदत गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल अस ठाकरे यांचे मत आहे. त्यामुळे येत्या २७ जुलै रोजी कार्यकर्ते आणि पदाधिकारी हा संदेश कसा घेतात ते पाहावं लागणार आहे. मात्र यातून दिला गेलेला सामाजिक संदेश नक्कीच चांगला आहे हे देखील तितकंच खरं आहे.

माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ व होर्डिंग्ज नको, पैसे सामाजिक उपक्रमांसाठी वापरा : उद्धव ठाकरे