3 May 2025 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

लोकसभेच्या प्रचारात पतीच्या धर्माच्या आधारे लक्ष केलं; आज पक्ष प्रवेशाची ऑफर?

Shivsena, BJP, Urmila Matondkar, Uddhav Thackeray, Devendra Fadnvis, Raj Thackeray

मुंबई : लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या अंतर्गत गटबाजीवरून प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मातोंडकर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाल शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान गोपाल शेट्टी यांनी मातोंडकर यांचा दारूण पराभव करत विजय प्राप्त केला होता.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. इतकेच नव्हे तर मातोंडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना एक लेखी पत्र देखील पाठवले होते. दरम्यान ते पत्र सार्वजनिक झाले. खासगी पत्र सार्वजनिक झाल्याने मातोंडकर चांगल्याच भडकल्या होत्या. मातोंडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना पाठवलेल्या त्या पत्रात आपल्या लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमुळेच आपला पराभव झाल्याचं म्हंटले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेनेने धर्माच्या राजकारणाला महत्व देत उर्मिला वयक्तीक आयुष्यात डोकावून उर्मिलाचे पती मोहसेन अख्तर मिर यांच्या मुस्लिम धर्मावरून त्यांना लक्ष केले होते आणि त्यासंबंधित विविध फोटोशॉप देखील जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले होते. त्यावर उर्मिला मातोंडकर यांनी देखील तीव्र शब्दात प्रतिउत्तर देत भाजप सेनेच्या समर्थकांची तोंडं बंद केली होती. मात्र आज त्याच उर्मिला मातोंडकर काँग्रेसवर नाराज होताच भाजप आणि शिवसेनेने त्यांना स्वतःच्या पक्षात ओढण्यासाठी गळ घातल्याचे समजते, मात्र उर्मिला मातोंडकर स्वाभिमान दाखवणार की केवळ राजकीय फायदा बघत या दोन पक्षांपैकी एकाची निवड करणार ते पाहावं लागणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या