13 April 2021 7:10 PM
अँप डाउनलोड

प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र कामतने आत्महत्या करून जीवन संपवले

Famous Artist Ramchandra Kamat, Found Dead, Mumbai Homes

मुंबई, २० ऑगस्ट : सिद्ध कलाकार आणि फोटोग्राफर राम इंद्रनील कामतने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले आहे. तो 41 वर्षांचा होता. मुंबईतील माटुंगा याठिकाणी बाथटबमध्ये रामचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मीडिया अहवालांच्या मते, राम गेल्या काही दिवसांपासून तणावामध्ये होता आणि लॉकडाऊन काळात ही परिस्थिती आणखी बिघडत गेली. पोलिसांना त्याच्या घरी एक सुसाइड नोट मिळाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

 

View this post on Instagram

 

When I’m in a good mood I let him click pics. #puppylove #babylove

A post shared by Ram Indranil Kamath (@instahindu) on

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास रामचंद्र उर्फ रामइंद्रनिल कामत यांचा माटुंग्यातील राहत्या घरी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर औषधोपचार करण्यासाठी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं लिहिलं आहे. रामचंद्र कामत चित्रकारासोबत छायाचित्रकारदेखील होते. माटुंग्यात आपल्या आईसोबत ते राहत होते. पोलिसांनी सुसाईड नोटमध्ये कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख असला तरी आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचा जबाब नोंदवला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

 

News English Summary: Popular Mumbai-based artist Ram Indranil Kamath also known as Ramchandra passed away at the age of 41 on Wednesday, informed Matunga Police on Thursday. According to a statement from Matunga Police Station, the painter was found unconscious in a bathtub at his Mumbai’s Matunga residence around 3 pm on Wednesday.

News English Title: Famous Artist Ramchandra Kamat Found Dead In His Mumbai Home News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x