20 April 2024 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

कोणाच्या म्हणण्यानं राज ठाकरे काही करतील, असे ते व्यक्ती नाहीत - फडणवीस

Former Cm Devendra Fadnavis, MNS Raj Thackeray, Hindutwa, Marathi Manus

मुंबई, २३ जून : देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.

यावेळी सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले सोशल मीडयाव सध्या 1.5 लाख फेक अकाऊंट आहेत. काँग्रेसचे फेक अकाउंट जास्त नसून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचंड फेक अकाऊंट असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. या फेक अकाऊंटवरुन ट्रोलिंग करण्यात येत आहे. महाराष्ट्र बचाव आंदोलनावेळी ट्विटर ट्रेडिंगमध्ये आमच्या आंदोलनाचे ट्विट होते. मात्र, या पक्षांच्या समर्थकांनी फेक अकाउंट तयार करुन आंदोलनाविरुद्ध मोहीम सुरु केली. यातूनच हे फेक अकाऊंट उघड झाले असून तेच फेक अकाऊंट आमच्याकडे ब्लॉक झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि मनसेबद्दल मत व्यक्त केलं. कोणाच्या म्हणण्यानं राज ठाकरे काही करतील, असे ते व्यक्ती नाहीत. राज ठाकरेंना त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कोणत्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली आहे हेदेखील त्यांना समजतं आणि ती कशी ती भरून काढायची यासंदर्भात त्यांच्याकडे एक योजना असते. जेव्हा शिवसेनेनं मराठी माणसासोबत हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तेव्हाच ती मोठी झाली. मराठी माणूस हा प्राण आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे, असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा ते एक राष्ट्रीय पक्ष झाले आणि त्यांना स्वीकारणारा वर्ग वाढला. राज ठाकरेंच्यादेखील हे लक्षात आलं की मराठी माणूस हा आपला केंद्रबिंदू असलाच पाहिजे. याला व्यापकता दिली नाही तर सध्याच्या परिस्थितीत आपली भूमिका मर्यादित होते. अनेक ठिकाणी भूमिकाही घेता येत नाहीत,” असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

“राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत आणि अनेकदा कोणालाही न सांगताही आमची भेट झाली आहे. त्यांच्यासोबत संवाद साधायलाही चांगलं वाटतं. अनेकदा त्यांनी माझ्यावर टीका केली, मीदेखील त्यांच्यावर टीका केली. एकमेकांची आम्ही उणीधुणीही काढली आहेत. परंतु त्यांच्याकडे एक विचार असतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळा दृष्टीकोन असतो. ज्यावेळी ते हिंदुत्वाकडे येत आहेत हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मी त्यांच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली,” असं फडणवीस म्हणाले.

 

News English Summary: Devendra Fadnavis discussed various issues in an interview to a YouTube channel. He also gave heartfelt answers on the current Corona situation in the state, politics, the economic situation of the country and trolling on social media.

News English Title: Former Cm Devendra Fadnavis Speaks About Mns Raj Thackeray Their Political Thoughts Hindutwa Marathi Manus News latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x