4 May 2025 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार असं म्हणालो होतो - किरीट सोमैया

Former MP Kirit Somaiya, Thackeray family, Shivsena

मुंबई, १३ नोव्हेंबर : अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की ‘कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा का फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात इतका खुपतोय का?,’ असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्ष ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये तब्बल २१ जमीन व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट एका पत्रकार परिषदेत केला आहे. ‘या दोन कुटुंबांचा नेमका काय संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. किरीट सोमय्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

‘कोणी काय व्यवहार करावा आणि कशासाठी करावा? हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते सांगू शकत नाहीत. वास्तविक सदर प्रकरण हे एका व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात आहे. एकाबाजूला त्यांची पत्नी व कन्या न्यायासाठी आक्रोश करत आहेत. त्याबद्दल शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते बोलत नाही. आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना हे कुठलेही फालतू मुद्दे घेऊन पुढं येताहेत. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे,’ असं खासदार संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे, संजय राऊत यांनी सोमय्या यांना दिलेल्या आव्हानाला त्यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. मुंबईच्या एसआरए गाळ्यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत किरीट सोमैया यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार आणि एसआरएविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. दिवाळीनंतर या जनहित याचिकेवर सुनावणी होईल असं माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार आहे. दहिसर येथील जमीन एका बिल्डरने २ कोटी ५५ लाखात घेतली आणि मुंबई महापालिका ९०० कोटीत ती जमीन विकत घेत आहे. मुलुंड येथे ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २२ एकर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी याबाबत मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी सुमोटो अधिकारातंर्गत तपास करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत. दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार हे आश्वासन दिले होते, ते मी पाळले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत काहीही बोलायला तयार नाहीत. या व्यवहारांवर हिंमत असेल तर शिवसेनेच्या कोणत्याही प्रवक्त्यांनी भाष्य करावे असं त्यांनी सांगितले.

 

News English Summary: The clashes between the Bharatiya Janata Party and the Shiv Sena is well underway, with Sanjay Raut responding to Somaiya’s challenge. Kirit Somaiya has filed a case in the Mumbai High Court against Mumbai Mayor Kishori Pednekar, the Thackeray government and the SRA, alleging scandal in the Mumbai SRA. Former MP Kirit Somaiya has said that the PIL will be heard after Diwali.

News English Title: Former MP Kirit Somaiya allegations over Thackeray family and shivsena news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या