20 April 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला
x

मंत्रालयात विनामास्क, विना RTPCR चाचणी प्रवेश बंदी | राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट टाळली

MNS Chief Raj Thackeray, CM Uddhav Thackeray, Covid guidelines, Mantralaya

मुंबई, ०२ मार्च: कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातल्यापासून सरकारने वारंवार मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे या उपाययोजना पाळायल्या सांगितल्या आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच कधीच मास्क घातला नाही. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते. परंतु राज ठाकरे विधान भवनात आल्यावर त्यांना कोविड १९ संसर्ग RTPCR चाचणी करणं आवश्यक होतं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही.

त्यामुळे विधान भवनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आलेत त्यांचं पालन राज ठाकरे करणार होते का..? हा देखील प्रश्नं विधान भवनात चर्चेत होता. पण अखेर RTPCR चाचणी केली नसल्यामुळे राज ठाकरे विधान भवनात आलेच नाहीत. राज ठाकरे हे वीजबिल आणि अन्य प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार होते अशी माहिती आहे. त्यासाठी ते मंत्रालयाच्या दिशेने निघणार होते. मात्र मंत्रालयात विनामास्क आणि विना RTPCR चाचणी प्रवेश नाही याची त्यांना माहिती मिळाली.

राज ठाकरे हे मास्क वापरत नाहीत असं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नाही याची कुणकुण लागल्याने राज ठाकरे माघारी फिरल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचे नियम कडक केलेले असताना आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात रात्रीच्या वेळी पब सुरू असल्याचे मनसैनिकांनी नुकतेचे फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून दाखवून दिले होते. तर काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवरही शंका उपस्थित केली होती.

 

News English Summary: Corona has said that since the riots in the state, the government has repeatedly taken measures such as wearing masks and observing social distances. However, MNS president Raj Thackeray never wore a mask from the beginning. Meanwhile, MNS president Raj Thackeray was to come to the Vidhan Bhavan today to meet Chief Minister Uddhav Thackeray. But when Raj Thackeray came to the Vidhan Bhavan, he had to undergo Covid 19 infection RTPCR test. But MNS president Raj Thackeray could not come to the Vidhan Bhavan as he did not test the corona.

News English Title: MNS Chief Raj Thackeray avoid CM Uddhav Thackeray meet because Covid guidelines for entry in Mantralaya news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x