14 December 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

एकाच मोबाईलवर दोन WhatsApp अकाउंट कसे वापराल? | या आहेत स्टेप्स

WhatsApp, Two accounts, one mobile

मुंबई, ०२ मार्च: सध्याच्या जीवनात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे आपण आपली बहुतांश कामे पार पाडण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतो. तसेच ही कामे करण्यासाठी स्मार्टफोन मध्ये विविध अॅप्लिकेशन्स सुद्धा दिले जातात. यामधील एक लाखो-करोडोंच्या संख्येने युजर्स असलेले WhatsApp सध्या एकमेकांना जोडण्यासाठी महत्वाचे काम करत आहे. या अॅप्लिकेशनमध्ये असे काही फिचर्स आहेत त्याबद्दल आपल्याला कधीच माहिती नसते. पण दुसरा व्यक्ती वापरत असताना ते पाहून आपल्याला सुद्धा त्याची उत्सुकता लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एकाच मोबाईल मध्ये दोन व्हॉट्सअॅपचे अकाउंट कसे तुम्ही वापरु शकता याबद्दल सांगणार आहोत. त्यासाठी काही सोप्प्या ट्रिक्स फक्त वापरण्याची गरज आहे. (Today we are going to tell you how you can use two WhatsApp accounts in one mobile. All you need to do is use a few simple tricks)

पहा कसे तुम्ही दोन व्हॉट्सअॅप अकाउंट एकाच मोबाईल मध्ये कसे वापरु शकता:

  1. एकाच स्मार्टफोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी प्रथम मोबाईलच्या सेटिंग मध्ये जावे लागणार आहे.
  2. तेथेच खाली तुम्हाला अॅप्लिकेशन आणि परमिशन असे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यास तुम्हाल अॅप क्लोनचा ऑप्शन ही मिळेल. यावर क्लिक करा.
  3. अॅप क्लोनमध्ये तुम्हाला फोनमधील सर्व अॅप्लिकेशन पहायला मिळतील. त्यामध्ये WhatsApp वर क्लिक करा. येथे क्लोन अॅप असे ही ऑप्शन दिसेल ते केल्यानंतर व्हॉट्सअॅप क्लोन बनेल.
  4. मुख्य म्हणजे तुमच्या सेटिंगमध्ये हे फिचर नसल्यास वरील बाजूस असलेल्या सर्च बारमध्ये अॅप क्लोन, ड्युअल अॅप किंवा Twin असे लिहून सर्च करु शकता. असे केल्यास तुम्हाला थेट अॅफ क्लोनपर्यंत पोहचता येईल.

फोनमध्ये स्पेशल फीचर कोणत्या नावाने मिळेल:
सध्या जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये पॅरलल अॅपचे फीचर दिले जात आहे. फीचर वेगवेगळे कंपनीच्या फोनमध्ये हे फीचर वेगवेगळ्या नावाने मिळते. खास बाब म्हणजे, या फीचरने कोणत्याही अॅपला क्लोन बनवले जाऊ शकते. हे फोनच्या कोणत्याही अॅपच्या हुबेहुब क्लोन तयार करतो. ज्यात तुम्हाला दुसरे अकाउंट चालवता येऊ शकते.

कोणत्या कंपनीच्या फोनमध्ये कोणत्या नावाचे फीचर मिळते, पाहा.

  • सॅमसंग स्मार्टफोनः ड्यूअल मेसेंजर
  • शाओमी स्मार्टफोनः ड्यूअल अॅप्स
  • रियलमी स्मार्टफोनः क्लोन अॅप्स
  • वनप्लस स्मार्टफोनः पॅरलेल अॅप्स
  • ओप्पो स्मार्टफोनः क्लोन अॅप्स
  • विवो स्मार्टफोनः अॅप क्लोन
  • आसुस स्मार्टफोनः ट्विन अॅप्स

 

News English Summary: Today we are going to tell you how you can use two WhatsApp accounts in one mobile. All you need to do is use a few simple tricks.

News English Title: You can use two WhatsApp accounts in one mobile news updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x