3 May 2025 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

गाळ काढण्यासाठी झाकणं उघडतात आणि कॉन्ट्रॅक्टर नंतर तशीच उघडी ठेऊन जातात: सविस्तर

Mumbai, BMC, Vishweshar Mahadeshwar, Mumbai Municipal Corporation, Manholes, Shivsena

मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर कोणत्याही गंभीर विषयावर काहीही संदर्भहीन प्रतिक्रिया देणे सुरूच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई झालेल्या जोरदार पावसामूळे पूर्ण मुंबईत पाणी तुंबलेले होते, मात्र महापौरांनी तो दावा फेटाळत पाणी कोठेही तुंबले नसून केवळ काही ठिकाणी साचले आहे असे विधान केले होते. मात्र आता तर त्यांनी विषयाचं मूळ आणि वास्तव समजून न घेताच पुन्हा एका गंभीर विषयावर अकलेचे तारे तोडले आहेत.

गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा नाल्यात पडून वाहून गेला आहे. या घटनेनंतर मुंबईकरांनी बीएमसीला दोषी ठरवले आहे. परंतु यावर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईकरांनाचं दोषी ठरवले आहे. स्थानिक लोकांच्या लापरवाहीमुळे मुंबईमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याचे अजब वक्तव्य महाडेश्वर यांनी केले. मुंबईकरांच्या लापरवाहीमुळेचं मुंबईत वारंवार दुर्दैवी घटना घडतात.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांनाही लोकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, महापौरांनी या घटनेसाठी मुंबईकरांनाच जबाबदर ठरवलं आणि मुंबईकरच गटारांची झाकणं उघडी ठेवतात असं म्हटलं होतं. यावेळी पुढे बोलताना त्यांनी पालिकेकडून वारंवार विनंती करुनही लोक कचरा टाकण्यासाठी गटारावरील झाकणं तोडतात असं सांगितलं असून मुंबईकरांना सिव्हिक सेन्स नसल्याची टीका केली होती.

मात्र वास्तव दुसरंच असून याबद्दल अनेक बातम्या यापूर्वी झळकल्या आहेत याची महापौरांना जाणीव नसावी. कारण मुंबईतील अनेक वॉर्डात असे प्रकार रोजच्या रोज घडत असल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी देखील केल्या होत्या. मुंबईतील नशेच्या आहारी गेलेले गर्दुल्ले पैशासाठी अनेक गल्ल्यांमध्ये फिरताना मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी किंवा गाळ काढण्यासाठी खुले केलेली नाल्यांची लोखंडी झाकणं शोधत असतात. कारण कर्मचारी देखील अनेक दिवस खुली केलेली झाकणं झाकण्यासाठी फिरकत नाहीत. त्यानंतर एका विशिष्ट वेळी इतर साथीदारांच्या मदतीने तेच मुंबईतील गर्दुल्ले ही झाकण ज्याचं वजन अंदाजे १०० ते २०० किलो असतं ते अंदाजे ३००० रुपयांच्या भावाने भंगारात विकतात आणि स्वतःच्या नशेचे मार्ग खुले करत असतात. हेच प्रकार प्लॅस्टिकच्या कचराकुंडीच्या बाबतची देखील घडतात.

दरम्यान सध्या लोकसंख्येच्या बाबतीत मुंबईतील ट्रॅफिकची स्थिती देखील भयंकर होत चालली आहे. परिणामी जागा कमी लागत असल्याने अनेक दुचाकी वाहन चालक ट्रॅफिकमध्ये अडकताच थेट फुटपाथवरून एकामागे एक अशा रांगेत जाताना दिसतात. मात्र त्याच फुटपाथवरील काँक्रीटच्या गटारांवरून देखील गाड्या जातात आणि पुन्हा पुन्हा दबाव पडत असल्याने आणि संबंधित गटारांवरील काँक्रीटची झाकणं निकृष्ट दर्जाची असल्याने ते वाहनाच्या वजनाने खचतात आणि कालांतराने फुटतात असे देखील निदर्शनास आले आहे. तर अनेक ठिकाणी मुंबई महापालिकेने नेमलेल्या कॉन्ट्रॅक्टर’कडून मुंबईच्या गटारांमधील गाळ काढून तो अनेक दिवस तसाच पडून असतो आणि त्यासोबत उघडण्यात आलेली काँक्रीटची झाकणं देखील तशीच उघडी राहतात आणि दुर्घटना होताच राहतात. मात्र या सर्व गोष्टींसाठी मुंबईचे महापौर मुंबईकरांनाच दोषी ठरवत असल्याने संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या