15 December 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

अहो महापौर! मनपा कर्मचारी झाकणं उघडी ठेवून जातात; अन गर्दुल्ले ती किलोने विकतात: सविस्तर

BMC, Mumbai Municipal Corporation, Brihan Mumbai Mahanagarpalika, Mumbai Mayor Vishweshwar Mahadeshwar, Rain

मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर कोणत्याही गंभीर विषयावर काहीही संदर्भहीन प्रतिक्रिया देणे सुरूच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई झालेल्या जोरदार पावसामूळे पूर्ण मुंबईत पाणी तुंबलेले होते, मात्र महापौरांनी तो दावा फेटाळत पाणी कोठेही तुंबले नसून केवळ काही ठिकाणी साचले आहे असे विधान केले होते. मात्र आता तर त्यांनी विषयाचं मूळ आणि वास्तव समजून न घेताच पुन्हा एका गंभीर विषयावर अकलेचे तारे तोडले आहेत.

गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा नाल्यात पडून वाहून गेला आहे. या घटनेनंतर मुंबईकरांनी बीएमसीला दोषी ठरवले आहे. परंतु यावर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईकरांनाचं दोषी ठरवले आहे. स्थानिक लोकांच्या लापरवाहीमुळे मुंबईमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याचे अजब वक्तव्य महाडेश्वर यांनी केले. मुंबईकरांच्या लापरवाहीमुळेचं मुंबईत वारंवार दुर्दैवी घटना घडतात.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांनाही लोकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, महापौरांनी या घटनेसाठी मुंबईकरांनाच जबाबदर ठरवलं आणि मुंबईकरच गटारांची झाकणं उघडी ठेवतात असं म्हटलं होतं. यावेळी पुढे बोलताना त्यांनी पालिकेकडून वारंवार विनंती करुनही लोक कचरा टाकण्यासाठी गटारावरील झाकणं तोडतात असं सांगितलं असून मुंबईकरांना सिव्हिक सेन्स नसल्याची टीका केली होती.

मात्र वास्तव दुसरंच असून याबद्दल अनेक बातम्या यापूर्वी झळकल्या आहेत याची महापौरांना जाणीव नसावी. कारण मुंबईतील अनेक वॉर्डात असे प्रकार रोजच्या रोज घडत असल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी देखील केल्या होत्या. मुंबईतील नशेच्या आहारी गेलेले गर्दुल्ले पैशासाठी अनेक गल्ल्यांमध्ये फिरताना मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी किंवा गाळ काढण्यासाठी खुले केलेली नाल्यांची लोखंडी झाकणं शोधत असतात. कारण कर्मचारी देखील अनेक दिवस खुली केलेली झाकणं झाकण्यासाठी फिरकत नाहीत. त्यानंतर एका विशिष्ट वेळी इतर साथीदारांच्या मदतीने तेच मुंबईतील गर्दुल्ले ही झाकण ज्याचं वजन अंदाजे १०० ते २०० किलो असतं ते अंदाजे ३००० रुपयांच्या भावाने भंगारात विकतात आणि स्वतःच्या नशेचे मार्ग खुले करत असतात. हेच प्रकार प्लॅस्टिकच्या कचराकुंडीच्या बाबतची देखील घडतात.

दरम्यान सध्या लोकसंख्येच्या बाबतीत मुंबईतील ट्रॅफिकची स्थिती देखील भयंकर होत चालली आहे. परिणामी जागा कमी लागत असल्याने अनेक दुचाकी वाहन चालक ट्रॅफिकमध्ये अडकताच थेट फुटपाथवरून एकामागे एक अशा रांगेत जाताना दिसतात. मात्र त्याच फुटपाथवरील काँक्रीटच्या गटारांवरून देखील गाड्या जातात आणि पुन्हा पुन्हा दबाव पडत असल्याने आणि संबंधित गटारांवरील काँक्रीटची झाकणं निकृष्ट दर्जाची असल्याने ते वाहनाच्या वजनाने खचतात आणि कालांतराने फुटतात असे देखील निदर्शनास आले आहे.

संबंधित विषयाला अनुसरून यापूर्वी डीएनए’ने देखील वृत्त प्रसिद्ध केले होते. ते पाहण्यासाठी येथे क्लीक करा

हॅशटॅग्स

#Mumbai(146)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x