14 December 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

बुलेटस्पीड धक्का | मेट्रो 3 च्या कारशेडसाठी बीकेसी'तील बुलेट ट्रेनच्या जागेची चाचपणी

Mumbai Metro 3, car shed Plot, Kanjurmarg, Bandra Kurla complex

मुंबई, १७ डिसेंबर: कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. हे आदेश देतानाच कोर्टाने येत्या फेब्रुवारीत या प्रकरणावर अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

यावर राऊत आज म्हणाले, “हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा विषय आहे. त्यावर अशाप्रकारे निर्णय आला असेल तर दुर्दैव आहे. याच जमिनीवर आधीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी हाऊसिंग प्रोजेक्ट सुरु करणार होतं. म्हणजे जमीन सरकारचीच आहे. तेव्हाचा तो प्रस्ताव काय होता याची मला माहिती आहे,” असं यावेळी ते म्हणाले. विशेष म्हणजे यावर काँग्रेसने कागदपत्र दाखविल्याने भाजपचे नेतेच यामध्ये अडथळे आणत असल्याचं दिसू लागले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने देखील दिल्लीतील मोदी सरकारला धक्का देण्यास सुरुवात केली आहे.

कारण मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होते आहे असं समजतं आहे. आरेमधून कारशेडची जागा कांजूरमार्गला गेल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. मेट्रो कारशेडबाबत कांजूरमार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पुढे कोर्टातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत असल्याचं वृत्त आहे.

 

News English Summary: Because it is understood that the site of Bandra Kurla Complex is being tested for the car shed of Metro 3. The case went to court after the car shed was shifted from Aarey to Kanjurmarg. Mumbai High Court has stayed the Metro car shed in Kanjurmarg. Further court hearings are likely to take a long time after the court adjourned the construction of a car shed at Kanjurmarg. So, can Metro 3’s car shed be erected on the proposed site for the bullet train in Bandra Kurla complex so as not to affect the work of Metro? It is reported that this option is being tested.

News English Title: Mumbai Metro 3 car shed now in Bandra Kurla complex news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x