15 December 2024 8:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच | पालिकेचा निर्णय

Mumbai BMC, Schools Colleges Reopening, Postponed

मुंबई, २९ डिसेंबर: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळांंबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याआधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२वीच्या पूर्वनियोजित पुरवणी परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येतील अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

 

News English Summary: Against the backdrop of the Corona crisis, the Mumbai Municipal Corporation has taken a big and important decision regarding schools. As a precautionary measure to prevent the spread of corona infection, the corporation has decided to close all government and private schools and colleges in the area till January 15. Earlier, all schools and colleges were closed till December 31, 2020.

News English Title: Mumbai Schools Colleges Reopening Postponed Till 15 January 2021 Due To Coronavirus Outbreak news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x