30 April 2025 8:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

राष्ट्रवादी भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत | अजित पवार आणि जयंत पाटलांवर जवाबदारी

NCP strategy, BJP MLAs, BJP

मुंबई, १३ ऑगस्ट : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. राजकीय मैदानावर बॅटिंग करताना कोणता चेंडू कधी टाकायचा आणि फिरकी घ्यायची हे ते उत्तम जाणतात. ते जे बोलतात त्याविरुद्ध करतात. विधानसभा निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे भाजपने ऑपरेशन कमळद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेतले आणि पाच-दहा नेते सोडता अख्खी राष्ट्रवादी खाली झाली. तेच सूत्र आता शरद पवार आखत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीतील गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी शरद पवारांकडून अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच, आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल, असंही बोललं जात आहे.

काही दिवसाआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच आता राष्ट्रवादीचे घरवापसी अभियान सुरु होणार असल्याची माहिती मिळते आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांच्या प्रवेश करून घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे भाजपचे कोणी आमदार आमच्याकडे आले तर त्यांना राजीनामा देऊन यावं लागेल, आमच्याकडे आल्यानंतर ते निवडूनदेखील येऊ शकतात.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

 

News English Summary: Just as during the assembly elections, the BJP sided with the NCP leaders through Operation Lotus, leaving five or ten leaders behind. It is understood from the sources that the same formula is being devised by Sharad Pawar now.

News English Title: NCP strategy to bring back the BJP MLAs who left NCP News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या